घरताज्या घडामोडीअमित शहा म्हणतात, 'CAAच्या मुद्द्यावर देशात दंगली'!

अमित शहा म्हणतात, ‘CAAच्या मुद्द्यावर देशात दंगली’!

Subscribe

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला 'दंगली', असं म्हणत यासाठी विरोधकांना जबाबदार म्हटलं आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून देशभरात आंदोलनं होत असतानाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मात्र या मुद्द्यावरून खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ‘नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात देशभरात दंगली घडवल्या गेल्या’, असं अमित शहा म्हणाले आहेत. विशेष म्हणजे, यासाठी त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जबाबदार धरलं आहे. ‘या तिघांनीच देशात या मुद्द्यावरून दंगली घडवल्या’, असं अमित शाह म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

नागरिकत्व सुधारणा विधेयकासाठी भाजपकडून आयोजित केलेल्या जनजागृती अभियानादरम्यान दिल्लीमध्ये आयोजित मेळाव्यात अमित शहा बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, ‘दिल्लीत २० महाविद्यालयं सुरू करण्याचा निर्णय अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केला होता. पण चष्मा लावून सुद्धा इथे शाळा किंवा महाविद्यालय दिसत नाहीत’, असं अमित शाह म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -