घरदेश-विदेशAmit Shah : 'लोकसभा निवडणुकीपूर्वी लागू होणार सीएए'; केंद्रीय गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

Amit Shah : ‘लोकसभा निवडणुकीपूर्वी लागू होणार सीएए’; केंद्रीय गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

Subscribe

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला आगामी लोकसभा निवडणुकीत 300 हून अधिक जागा मिळतील. तर एनडीएला 400 हून अधिक जागा मिळतील. सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालावर शंका नाही. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांना पुन्हा विरोधी बाकावर बसावे लागेल, याची जाणीव झाली आहे. असा विश्वास व्यक्त करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज एका कार्यक्रमात वक्तव्य केले की, देशात निवडणुकीपूर्वी नागरिकत्व (सुधारणा) कायदा (CAA) लागू होणार आहे. (Amit Shah CAA will be implemented before Lok Sabha elections Union Home Minister big announcement)

हेही वाचा – Uddhav Thackeray : “महाराष्ट्राचे गृहमंत्री मनोरुग्ण…”, उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर घणाघाती टीका

- Advertisement -

अमित शहा म्हणाले की, जम्मू-काश्मीरला पूर्वीच्या राज्याचा विशेष दर्जा देणाऱ्या घटनेतील कलम 370 मधील बहुतांश तरतुदी आम्ही रद्द केल्या आहेत. त्यामुळे देशातील जनता भाजपाला 370 आणि एनडीएला 400 हून अधिक जागांवर आशीर्वाद देईल, असा आम्हाला विश्वास आहे. असे म्हणतानाच अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’वर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, नेहरू-गांधी घराण्याच्या वंशजांना असा मोर्चा काढण्याचा अधिकार नाही, कारण 1947 मध्ये देशाच्या फाळणीला त्यांचा पक्ष जबाबदार होता.

यूपीएची अनियमितता जाणून घेण्यासाठी श्वेतपत्रिका आवश्यक

सरकारने संसदेत मांडलेल्या श्वेतपत्रिकेसंदर्भात माहिती देताना अमित शहा म्हणाले की, हे आवश्यक होते, कारण 2014 मध्ये सत्ता गमावण्यापूर्वी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीने (यूपीए) काय चूक केली हे जाणून घेण्याचा देशाला पूर्ण अधिकार आहे. दहा वर्षांनंतर आमच्या सरकारने अर्थव्यवस्थेला संजीवनी दिली आहे. परकीय गुंतवणूक आली आणि भ्रष्टाचार झाला नाही. त्यामुळे श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची हीच योग्य वेळ होती.

- Advertisement -

हेही वाचा – Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

निवडणुकीपूर्वी देशात सीएए लागू होणार

नागरिकत्व (सुधारणा) कायद्याबाबत (सीएए) अमित शाह म्हणाले की, निवडणुकीपूर्वी याबाबत अधिसूचना येईल. यासंदर्भात नियम जारी केल्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी केली जाईल. सीएए हा कोणाचेही नागरिकत्व काढून घेणारा कायदा नाही. मात्र आपल्या मुस्लिम बांधवांची दिशाभूल केली जात आहे. सीएए कायदा फक्त पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशात छळ सहन करून भारतात आलेल्या लोकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे. हा कायदा कोणाचेही भारतीय नागरिकत्व हिरावून घेणारा नाही, असेही अमित शहा यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -