Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश अमित शहा यांनी एका रात्रीत बदललं गुजरातच राजकारण!

अमित शहा यांनी एका रात्रीत बदललं गुजरातच राजकारण!

Related Story

- Advertisement -

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून अद्याप त्यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण समजू शकले नाही. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे अमित शाह यांचे एकदम खास असल्याने रुपाणी यांच्या राजीनाम्याने देशभरासह गुजरातच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, आता नवा मुख्यमंत्री कोण होणार, कोणाला मंत्रिपदातून बाहेर पडावं लागणार याच्या चर्चांना उधाण येऊ लागले आहे. मात्र यामागे अमित शहांचीच खेळी असल्याचे समोर येत आहे.

विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यापूर्वी एक महिना आधी रुपाणी सरकारने महोत्सव साजरा केला होता. मात्र एका महिन्यातच त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. जर महिनाभरापूर्वीच रुपाणी सरकारच्या यशाचा महोत्सव साजरा करण्यात आला तर आता चेहरा बदलण्याची गरज का पडली, असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. दरम्यान, विजय रुपाणी यांच्या अपयशाला झाकण्यासाठी भाजपाने ही खेळी केली का? असा आरोप सध्या केला जात आहे.

- Advertisement -

अमित शाह यांच्याशी जवळीक असलेले विजय रूपानी हे त्यांच्या विश्वासातील नेते असताना देखील त्यांनी राजीनामा का दिला असावा? असा प्रश्न सध्या समोर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित शाह हे दोन दिवसांपूर्वी अचानक रात्रीच्या वेळी गुजरातमध्ये दाखल झाले होते. यानंतर ते थेट दिल्लीकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली, यामध्येच रुपाणी यांच्या राजीनाम्याचा निर्णय झाला. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे. अशा वेळी सत्ताबदलाबाबत राजकीय घडामोडींना वेग आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी मराठी माणूस?

रुपाणी यांच्या राजीनाम्यामुळे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी चंद्रकांत रघुनाथ उर्फ सी. आर. पाटील या मराठी माणसाची नियुक्ती केली जाण्याची दाट शक्यता आहे. सी. आर. पाटील हे सध्या गुजरात भाजपचे अध्यक्ष आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या जवळचे मानले जातात. महाराष्ट्रातील जळगावमध्ये जन्मलेले सी. आर. पाटील यांचे शिक्षण गुजरातमधील सुरतमध्ये झाले आहे. १७ व्या लोकसभेत ते सुरत मतदार संघातून तब्बल ५ लाख ५८ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. मतदारसंघात सरकारी सेवेचे देखरेख आणि उत्तम प्रशासनासाठी पाटील यांच्या कार्यालयाला आयएसओ सर्टिफिकेट मिळाले आहे. असे सर्टिफिकेट मिळालेले देशातील ते पहिलेच खासदार आहेत.


- Advertisement -

 

- Advertisement -