घरताज्या घडामोडीKarnataka Election 2023: काँग्रेसची बुद्धी भ्रष्ट झालीये, अमित शाहांचा खर्गेंवर पलटवार

Karnataka Election 2023: काँग्रेसची बुद्धी भ्रष्ट झालीये, अमित शाहांचा खर्गेंवर पलटवार

Subscribe

कर्नाटकात काँग्रेस आणि भाजपकडून प्रचाराला सुरूवात झाली आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी धारवाडमध्ये काँग्रेसमध्ये जोरदार टीका केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यालाच अनुसरून अमित शाहांनी खर्गेंवर पलटवार केला आहे.

ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संपूर्ण जग आदर करते, त्यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष विषारी साप म्हणतात. सोनिया गांधी सौदागर म्हणतात. परंतु काँग्रेसची बुद्धी भ्रष्ट झालीये. जी जितक्या शिव्या मोदींना देतील, तेवढ्याच चांगल्या पद्धतीने कमळ अजून फुलेल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

- Advertisement -

काँग्रेसने माझ्याविरोधात पोलिसांत एफआयआर दाखल केला आहे. PFIवर बंदी घालून आम्ही कर्नाटक सुरक्षित केले आहे. मी घाबरत नाही. तुमचा काही आक्षेप असेल तर या आणि PFI का चालू ठेवायचे ते सांगा. व्होट बँकेच्या लालसेपोटी काँग्रेसने पीएफआयला डोक्यावर घेतले होते.

- Advertisement -

काँग्रेस 70 वर्षांपासून कलम 370 लहान मुलाप्रमाणे सांभाळत आहेत. काँग्रेस, जेडीएस, सपा, बसपा, ममता हे सर्वच म्हणायचे की काढू नका, नाहीतर काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या वाहतील. कलम 370 हटवले, रक्ताच्या नद्या सोडा, दगड मारण्याची देखील हिंमत झाली नाही, असं अमित शाह म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटकातील नवलगुंड विधानसभा मतदारसंघातील जाहीर सभेत सांगितले की, एका बाजूला राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष आहे तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप आहे. कर्नाटकच्या जनतेला पुढे घेऊन जाण्यासाठी डबल इंजिनचं सरकार हवे आहे. जो पक्ष शेतकऱ्यांचा आदर करत नाही आणि त्यांच्यावर लाठीचार्ज करतो. त्यांना नवलगुंडमधून मतं मागण्याचा अधिकार नाही, असंही अमित शाह म्हणाले.


हेही वाचा : ऐकावं ते नवलचं! बारावीत कमी टक्के मिळाल्याने घरमालकानं भाडेकरूला नाकारलं


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -