घरदेश-विदेशव्होटबँकेच्या राजकारणामुळे आतापर्यंत 'हैदराबाद मुक्ती दिन' साजरा झाला नाही, अमित शाहांची टीका

व्होटबँकेच्या राजकारणामुळे आतापर्यंत ‘हैदराबाद मुक्ती दिन’ साजरा झाला नाही, अमित शाहांची टीका

Subscribe

हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत शनिवारी हैदराबाद मुक्ती दिवस साजरा करण्यात आला. सरकारच्या पाठिंब्यावर हा दिवस साजरा केला पाहिजे, अशी मागणी होती. पण 75 वर्षं झाली तरी, व्होटबँकेच्या राजकारणामुळे येथील आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी हैदराबाद मुक्तीदिवस साजरा करण्याचे धाडस दाखवले नाही, हे दुर्दैवाच आहे, अशी टीका अमित शाह यांनी केली.

हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात अमित शाह यांनी हैदराबादच्या मुक्तीचे श्रेय सरदार वल्लभभाई पटेल यांना दिले. त्याचबरोबर हा दिवस साजरा करण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. हा दिवस साजरा करण्याचे आश्वासन तर अनेकांनी दिले. पण सत्तेत आल्यावर रजाकारांच्या भीतीने धाडस दाखवले नाही. 75 वर्षांनी हा दिवस साजरा केला जात आहे. आतापर्यंत व्होटबँकेवर डोळा ठोवून हा दिवस साजरा केला जात नाही. पंतप्रधानांनी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी मोदी यांचे अभिनंदन करतो. हा दिवस साजरा करण्याचे मोदी यांनी घोषित करताच हैदराबादेतील नागरिक त्यासाठी लगेच तयार झाले, असे ते म्हणाले.

- Advertisement -

जोपर्यंत निजामाला हरवत नाही, तोपर्यंत अखंड भारताचे स्वप्न वास्तवात येणार नाही, याची कल्पना सरकार पटेल यांना होती, असे सांगून अमित शाह म्हणाले, या मुक्तीआंदोलनाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हा दिवस साजरा केला जात आहे. मुक्तीसंग्रामात सहभागी झालेले सैनिक तसेच शहिदांच्या स्मृती जागवून नव्या पिढीत राष्ट्रप्रेम निर्माण करायचे आहे.

आजच्याच दिवशी 1948 मध्ये तेलंगणा, मराठवाडा स्वतंत्र झाले. निजाम आणि त्याच्या रझाकारांनी विविध प्रकारचे कठोर कायदे लागू करून असह्य अन्याय आणि महिलांवर अत्याचार करून जनतेला चिरडण्याचा प्रयत्न केला होता. ही दुष्कृत्य आणि अत्याचाराविरोधात जनतेने आंदोलन केले होते. 13 ते 17 सप्टेंबर 1948 दरम्यान झालेल्या 109 तासांच्या संघर्षात अनेक वीर या ठिकाणी शहीद झाले आणि शेवटी आपण विजयी झालो. यासाठी आपले लोहपुरुष सरदार पटेल यांचा आभारी आहे. त्यांनीच निजामाच्या सेनेला पराजीत करून हा भूभाग स्वतंत्र केला. ते नसते तर, हैदराबादच्या मुक्तीसाठी आणखी शेकडो वर्षे लागली असती, असा टोलाही त्यांनी लगावला.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -