घरदेश-विदेशगुजरात दंगलीला नेहमीच राजकीय नजरेतून पाहिले गेले, मी मोदींचे दु:ख जवळून पाहिले...

गुजरात दंगलीला नेहमीच राजकीय नजरेतून पाहिले गेले, मी मोदींचे दु:ख जवळून पाहिले – अमित शाह

Subscribe

गुजरात दंगलीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी एएनआय या वृतसंस्थेला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत गुजरात दंगली प्रकरणात मोदींवर केलेले सर्व आरोप सर्वोच्च न्यायालयाने सर्व आरोप फेटाळून लावल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले आहे. 2002 मध्ये झालेल्या या गुजरात दंगलीबाबत अनेक मोठे खुलासे अमित शाह यांनी केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या क्लीन चीटवर   समाधान व्यक्त केले आहे. गुजरात दंगली नेहमीच राजकीय नजरेतून पाहिल्या गेले, मात्र सत्य  सोन्यासारखे बाहेर आले आहे. या वेळच्या पंतप्रधान मोदींच्या वेदना मी जवळून पाहिल्या आहेत, असं अमित शाह म्हणाले. पंतप्रधान मोदींवर खोटे आरोप करण्यात आले. ज्यांनी हे केले त्यांनी आता माफी मागावी. कारण मोदीजींनी नेहमीच कायद्याचे समर्थन केले, अशी मागणीही अमित शाहांनी केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, १८ ते १९ वर्षांची लढाई देशाचा एवढा मोठा नेता एक शब्दही न काढता दु:ख भगवान शंकराच्या विषाप्रमाणे गिळू लढत राहिला आणि आज अखेर जेव्हा सत्य सोन्यासारखे चमकून बाहेर आले. म्हणून आनंद होत आहे. न्यायिक प्रक्रिया सुरु असल्याने मोदीजींना या वेदनांना तोंड देताना मी जवळून पाहिले आहे. त्यामुळे सर्वकाही खरे असूनही काहीही बोलणार आहे. मनाने खूप मजबूत ही भूमिका फक्त हा माणूसच घेऊ शकतो.

- Advertisement -

दंगलीवरील आरोप फेटाळताना अमित शाह म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने सर्व आरोप फेटाळले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने हे सिद्ध झाले आहे की, सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित होते. न्यायालयाने निर्णय दिला की, सरकारने शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, गुजरात दंगलीकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहिले गेले. गुजरात दंगली प्रकरणातील मोंदींवर केलेले आरोप हे राजकीय सुडीबुद्धीने केल्याचे सुप्रीम कोर्टाने सिद्ध केले. असही अमित शाह म्हणाले.


‘हे’ बेडकासारखे आले कुठून? नारायण राणेंच्या टीकेला राष्ट्रवादीचं बोचरं प्रतिउत्तर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -