घरताज्या घडामोडीमोदींच्या अपमानाला गुजरातची जनताच.., अमित शाहांचा खर्गेंवर पलटवार

मोदींच्या अपमानाला गुजरातची जनताच.., अमित शाहांचा खर्गेंवर पलटवार

Subscribe

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रावणाशी केली होती. तुम्ही १०० डोकी असलेल्या रावणासारखे आहेत का?, अशी टीका खर्गेंनी मोदींवर केली होती. दरम्यान, मोदींच्या अपमानाला गुजरातची जनताच उत्तर देईल, असा पलटवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मल्लिकार्जुन खर्गेंवर केला आहे.

गुजरातमध्ये निवडणुकीला सुरूवात झाली आहे. यावेळी अमित शाह म्हणाले की, गुजरातमध्ये जितक्या वेळा काँग्रेसने पंतप्रधानांविरुद्ध अपशब्द वापरले, तितक्या वेळा जनतेने मतपेटीतून प्रतिसाद दिला आहे. यावेळी मोदींच्या अपमानाला गुजरातची जनता उत्तर देईल, असं वक्तव्य अमित शाह यांनी अहमदाबादमध्ये रोड शो दरम्यान केलं.

- Advertisement -

मोदींनीही काँग्रेस नेत्यांनी केलल्या विधानावर खंत व्यक्त केली आहे. मोदींचा सर्वात जास्त अपमान कोण करतो, याची काँग्रेसमध्ये स्पर्धा सुरू आहे. पण एक गोष्ट लिहून ठेवा. जितका चिखल टाकाल, तितकी कमळं फुलतील, असं मोदी गुजरातमधील एका निवडणूक सभेत म्हणाले.

खर्गे काय म्हणाले होते.?

- Advertisement -

सर्व निवडणुकांमध्ये पंतप्रधान लोकांना चेहरा पाहून मतदान करा, असं सांगतात. तुम्ही १०० टोकी असलेल्या रावणासारखे आहात का?, असं मल्लिकार्जुन खर्गेंनी गुजरातमध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना म्हणाले होते.


हेही वाचा : भारताला जी-20 चं अध्यक्षपद मिळताच पीएम मोदींचा नवा अजेंडा, परराष्ट्र मंत्र्यांनीही दिला संदेश


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -