कोरोना संपताच नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला जाईल – अमित शहा

Amit Shah said Citizenship Reform Act will be implemented at after corona ends
Amit Shah said Citizenship Reform Act will be implemented at after corona ends

कोरोनाची लाट संपताच नागरिकत्न सुधारणा कायदा लागू केला जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. यावेळी त्यानी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला. ते सिलीगुडी येथे एका सभेला संबोधित करताना बोलत होते.

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी असलेला तृणमूल काँग्रेस पक्ष CAA कायद्याबद्दल अफवा पसरवत आहे. पण मी सांगू इच्छितो की कोरोनाची लाट संपताच आम्ही सीएए कायदा लागू करू, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी नेहमीच गोरखा जनतेची दिशाभूल केली. भाजपनेच त्यांचे हित जपले. ते म्हणाले की मी बंगालच्या जनतेचे आभार मानू इच्छितो की त्यांनी विधानसभेतील भाजप आमदारांची संख्या तीनवरून 77 पर्यंत वाढविण्यात मदत केली. टीएमसीच्या अत्याचाराविरुद्ध लढत राहणार, असेही ते म्हणाले.

यावेळी पश्चिम बंगालमध्ये भाजपशासित राज्यांपेक्षा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जास्त आहेत, कारण ममता बॅनर्जी सरकारनं इंधनावरील स्थानिक कर कमीच केले नाहीत. पश्चिम बंगाल एकमेव राज्य आहे, जिथे पेट्रोल 105 रूपये लिटर आहे, अशी टीका अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी दोन दिवसीय पश्चिम बंगाल दौऱ्यावर आले आहेत. अमित शहा गुरुवारी सकाळी कोलकाता विमानतळावर पोहोचले होते, जिथे त्यांचे भाजपचे ज्येष्ठ नेते शुभेंदू अधिकारी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक आणि भाजपचे प्रदेश प्रमुख सुकांता मजुमदार यांनी स्वागत केले.