घरदेश-विदेशपश्चिम बंगालमधून घुसखोरांना पिटाळून लावणार - अमित शाह

पश्चिम बंगालमधून घुसखोरांना पिटाळून लावणार – अमित शाह

Subscribe

मतांच्या राजकारणापुढे ममता बॅनर्जी यांना नागरिकांच्या हिताचे भान राहिले नसून तृणमूल काँग्रेसची हुकूमशाही जास्त दिवस टिकणार नाही, असे अमित शहा म्हणाले आहेत.

‘ज्याप्रमाणे आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप लागू करण्यात आले त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमधूनही घुसखोरांना पिटाळून लावण्यात येईल’, असे भारतीय जनता पार्टीचे अमित शहा म्हणाले आहेत. पश्चिम बंगालच्या उत्तर दिनापूर येथे प्रचारसभेमध्ये ते बोलत होते. याप्रचारसभेत त्यांनी हिंमत असेल तर विरोध करून दाखवा, असे खुले आव्हान अमित शाह यांनी केले आहे. हे आव्हान त्यांनी तृणमूल काँग्रेस प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केले आहे.

नेमकं काय म्हणाले अमित शाह?

पश्चिम बंगाल सरकारवर गंभीर आरोप करीत अमित शाह म्हणाले की, इथल्या मुख्यमंत्री तुष्टीकरणात इतक्या पुढे गेल्या आहेत की नागरिकांच्या इच्छेविरुद्ध सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये बंगाली ऐवजी उर्दूचा वापर करण्यासाठी भाग पाडत आहेत. ते पुढे म्हणाले की, मतांच्या राजकारणापुढे त्यांनी नागरिकांच्या हिताचे भान राहिले नसून तृणमूल काँग्रेसची हुकूमशाही जास्त दिवस टिकणार नाही. तृणमूल काँग्रेस पक्ष तुष्टीकरण, माफियाराज आणि चिट फंड या तीन गोष्टींनी ओळखला जात असून संपूर्ण बंगालमध्ये नरेंद्र मोदींना मिळणाऱ्या जनसमर्थनामुळे दीदींची झोप उडाली आहे, अशी खोचक टीका शाह यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -