गृहमंत्री अमित शहांनी पुलवामा CRPF कँपमध्ये केला मुक्काम; या गंभीर मुद्द्यांवर केली चर्चा

amit shah spends night at crpf camp in pulwama and take dinner with soldiers
गृहमंत्री अमित शहांनी पुलवामा CRPF कँपमध्ये केला मुक्काम; या गंभीर मुद्द्यांवर केली चर्चा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी सोमवारी पुलवामामधील केंद्रीय रिजर्व्ह पोलीस दल (CRPF) कँपमध्ये मुक्काम केला. यावेळी काल रात्री अमित शहा यांनी सीआरपीएफ कँपमध्ये थांबून जवानांसोबत जेवले. याबाबतची माहिती अमित शहा यांनी स्वतः ट्वीट करत सांगितली होती. अमित शहा यांच्यासोबत जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा देखील सीआरपीएफ कँपमध्ये होते.

अमित शहा यांनी पुलवामा येथे पोहोचल्यानंतर काश्मीरमधील दहशतवाद आणि दगडफेकीच्या घटनांवर आपले मत मांडले. ते म्हणाले की, ‘दहशतवाद्यांविरोधात मोदी सरकारचे झिरो टॉलरेंस नीती असून सर्वसामान्यांना वाचवणे हे आमचे प्राधान्य आहे.’ शिवाय शहा म्हणाले की, ‘पूर्वी कश्मिरमधून दगडफेकीच्या घटना खूप ऐकू येत असे. पण आजची परिस्थिती वेगळी आहे.’

सीआरपीएफ कँपच्या दरम्यान अमित शहा म्हणाले की, ‘आज काश्मीरमधल्या दगडफेकीच्या घटनांची संख्या कमी झाली आहे. हे मानवतेच्या विरोधात आहे आणि हे आम्ही सहन करू शकत नाही.’

‘२०१४ पासून २०२१ दरम्यान दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू आणि जवानांच्या शहीद होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. २००४ ते २०१४ दरम्यान दहशतवादी हल्ल्यात २०८ नागरिक मारले गेले होते. तर २०१४ ते २०२१ दरम्यान ही संख्या कमी झाली आहे. यादरम्यान ६० जवान शहीद झाले होते आणि नागरिक मारले गेल्याची संख्या ३० आहे. शहीद जवांना श्रद्धांजली. जवानांचे बलिदान आपण विसरू शकत नाही.’ असे अमित शहा म्हणाले.


हेही वाचा – IND vs PAK : पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजर करणाऱ्या काश्मिरींवर राग का? मेहबुबा मुफ्तींचा सवाल