Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशAmit Shah : 2026 ची सुरुवात स्टॅलिन सरकारच्या अंताने होईल, हिंदी भाषाविरोधी वादादरम्यान शहांचे प्रत्युत्तर

Amit Shah : 2026 ची सुरुवात स्टॅलिन सरकारच्या अंताने होईल, हिंदी भाषाविरोधी वादादरम्यान शहांचे प्रत्युत्तर

Subscribe

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधील तीन भाषांच्या आदेशाप्रकरणी सध्या तामिळनाडू सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरू आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी राज्य ‘दुसऱ्या भाषा युद्धा’साठी तयार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधील तीन भाषांच्या आदेशाप्रकरणी सध्या तामिळनाडू सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरू आहे. तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी गेल्याच आठवड्यात हिंदीमुळे तामिळ भाषा संपुष्टात येईल, असे विधान केले होते. यानंतर आता मंगळवारी (25 फेब्रुवारी) तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी राज्य ‘दुसऱ्या भाषा युद्धा’साठी तयार असल्याचे म्हटले आहे. तसेच केंद्र सरकार आमच्यावर दबाव आणण्यासाठी आमचे पैसे रोखत आहे. पण आम्ही 2000 कोटी रुपयांसाठी आमचे हक्क सोडणार नाही, अन्यथा तामिळ समाज 2000 वर्षे मागे जाईल, असे त्यांनी म्हटले. एमके स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Amit Shah strong response to Tamil Nadu Chief Minister MK Stalin during the anti-Hindi language controversy)

अमित शहा यांनी आज (26 फेब्रुवारी) कोइम्बतूरमधील भाजपा जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, जगातील सर्वात जुन्या भाषांपैकी एक असलेल्या तमिळ भाषेत मी बोलू शकत नाही याचे मला वाईट वाटते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळ भाषा आणि तमिळ संस्कृतीच्या संवर्धनासाठी खूप काम केले आहे. पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये दिले आहेत. पण यूपीएच्या काळात तामिळनाडूवर अन्याय झाला आहे. असे म्हणत अमित शहा यांनी द्रमुकचा त्रिभाषिक धोरणाला तीव्र विरोध आहे, पण राज्याच्या द्विभाषिक आदेशाचे पालन करण्याचे मी वचन दिले आहे, असे स्पष्ट केले.

हेही वाचा – Congress : कॉंग्रेसमध्ये सारेच नेते, कार्यकर्त्यांची मात्र वानवा, काय म्हणाले शशी थरूर?

एमके स्टॅलिन सरकारवर हल्ला चढवत अमित शहा म्हणाले की, 2025 ची सुरुवात दिल्लीतील विजयाने झाली आहे. यानंतर आता 2026 ची सुरुवात तामिळनाडूमध्ये एनडीए सरकार स्थापनेपासून आणि स्टॅलिन सरकारच्या अंताने होईल. तामिळनाडूतील द्रमुकच्या देशविरोधी सरकारचा अंत करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये एनडीए सरकार स्थापन करण्यासाठी सर्वांनी आता सज्ज व्हावे. तामिळनाडूमध्ये स्थापन होणारे सरकार एका नवीन युगाची सुरुवात करेल. घराणेशाहीचा धंदा आणि भ्रष्टाचार कायमचा इथेच संपेल, असा इशारा त्यांनी दिला.

भाजपा तामिळनाडूमध्ये मोठ्या बहुमताने सत्तेत येईल

अमित शहा म्हणाले की, 2024 हे भाजपासाठी ऐतिहासिक वर्ष होते. 2024 मध्ये, पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आले. बऱ्याच काळानंतर आम्ही आंध्र प्रदेशात सरकार स्थापन केले. दिल्ली, महाराष्ट्र आणि हरियाणामधील विजयावरून लोकांना भाजपावर विश्वास असल्याचे दिसून येते. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपा महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये मिळालेल्या मोठ्या बहुमताने सत्तेत येईल, असा विश्वासही अमित शहा यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Farming : शेतात जाण्यासाठी तरुणाने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितले हेलिकॉप्टर, काय आहे प्रकरण?