घरताज्या घडामोडीअमित शाह भाजप अध्यक्षपदावरून पायउतार होणार, 'हे' भाजपचे नवे अध्यक्ष!

अमित शाह भाजप अध्यक्षपदावरून पायउतार होणार, ‘हे’ भाजपचे नवे अध्यक्ष!

Subscribe

एकीकडे देशात सीएए, एनपीआर आणि एनआरसीवरून मोठा वाद सुरू असतानाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना भाजप अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागणार आहे.

नागरीकत्व सुधारणा विधेयकामुळे भाजप अध्यक्ष अमित शाह टीकेच्या केंद्रस्थानी आले आहेत. कलम ३७० त्या वेळी देखील त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर सीएए, एनपीआर आणि एनआरसीमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर टार्गेट केलं गेलं. त्यामुळे गेल्या महिन्याभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षाही देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह हेच जास्त चर्चेत होते. आता पुन्हा एकदा अमित शाह चर्चेत आले आहेत. गेल्या ५ वर्षांपासून भाजपच्या अध्यक्षपदावर असलेले अमित शहा आता त्या पदावरून पायउतार होणार आहेत.

२०१७मध्ये मिळाली होती मुदतवाढ!

जुलै २०१४मध्ये अमित शाह राजनाथ सिंह यांच्यानंतर भाजपचे अध्यक्ष झाले होते. भाजपच्या पक्षीय नियमानुसार एखादी व्यक्ती अध्यक्षपदी ३ वर्षांसाठी राहू शकते. त्याहून जास्त हा कार्यकाळ अजून ३ वर्षांसाठी वाढवता येईल अशी पक्षीय घटनादुरूस्ती भाजपने नंतर केली. त्यानुसार अमित शाह यांना २०१७मध्ये मुदतवाढ देण्यात आली होती. आता १९ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा भाजपच्या अध्यक्षपदासाठीची निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. सलग २ टर्म अध्यक्षपद भूषवल्यामुळे अमित शाह यांना आता पदावरून पायउतार व्हावं लागणार आहे. त्याचवेळी पक्षाच्या नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा देखील केली जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भाजपच्या अडचणीत वाढ? जस्टिस लोया प्रकरणाची फाईल ओपन होणार?

कोण असेल भाजपचे नवे अध्यक्ष?

दरम्यान, भाजपच्या नव्या अध्यक्षांच्या नावावर बरीच चर्चा सध्या सुरू असलेली पाहायला मिळत आहे. पक्षीय पातळीवर अनेक नावं यासाठी चर्चेत असली, तरी सध्या कार्यकारी अध्यक्ष असलेले जे. पी. नड्डा हेच भाजपचे पुढचे अध्यक्ष असतील, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नड्डा हे अमित शाह यांचेच निकटवर्तीय मानले जातात. तरूणपणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष असलेले नड्डा पहिल्यांदा हिमाचल प्रदेशमधून आमदार झाले. २०१२मध्ये ते राज्यसभेवर खासदार म्हणून गेले. २०१४साली सत्तेत आलेल्या एनडीएमध्ये नड्डा मंत्री देखील होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -