घरताज्या घडामोडीअशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, कठोर कारवाई केली जाईल- अमित शाह

अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, कठोर कारवाई केली जाईल- अमित शाह

Subscribe

नवी दिल्लीतील जामिया भागात झालेल्या गोळीबाराचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. यापार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी टि्वट केले असून या घटनेप्रकरणी माझे दिल्ली पोलीस आयुक्तांबरोबर बोलणे झाले असून केंद्र सरकार अशा घटना खपवून घेणार नाही. यावर गंभीर कारवाई केली जाईल असा इशारा शहा यांनी टि्वटमधून दिला आहे.

सीएए व एनआरसीला विरोध दर्शवण्यासाठी आज नवी दिल्लीत आंदोलन करण्यात आले. यात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विद्यर्थ्यांची रॅली जामिया इस्लामिया विद्यापीठाजवळ पोहचताच एका तरुणाने वंदे मातरम , दिल्ली पोलीस जिंदाबादचा नारा देत अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यात शादाब नावाचा एक विद्यार्थी जखमी झाला. तर अनेकजण किरकोळ जखमी झाले आहेत. विेशेष म्हणजे ज्यावेळी हा हल्लेखोर गोळीबार करत होता त्यावेळी तिथे पोलिसही होते. पण कोणीही त्याला अडवले नाही. यामुळे हे प्रकरण ्धिकच चिघळले असून या घटनेनंतर विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी टि्वट करून मोदी सरकारला लक्ष्य केले. भाजपचे मंत्री लोकांना चिथावणीखोर भाषण करून लोकांची माथी भडकवतील तर असे होणे शक्य आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचे उत्तर द्यावे की ते हिंसेबरोबर आहेत की अहिंसेबरोबर. विकासाबरोबर आहेत की अराजकतेबरोबर. असे प्रियांका यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -