घरदेश-विदेशभडकाऊ भाषणावर होणार कडक कारवाई; अमित शाहांचा इशारा

भडकाऊ भाषणावर होणार कडक कारवाई; अमित शाहांचा इशारा

Subscribe

नवी दिल्लीः भडकाऊ भाषण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला आहे. मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री शाह यांची भेट घेतली. मुस्लिमविरोधी सुरु असलेल्या घटनांची माहिती या प्रतिनिधींनी मंत्री शाह यांना दिली. त्यावर मंत्री शाह यांनी हा इशारा दिला.

मंगळवारी रात्री ११ वाजता मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी मंत्री शाह यांची भेट घेतली. मौलना महमूद मदनी, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे कमाल फारुकी, नियाज फारुकी व प्रो अख्तरुल हे सर्व या प्रतिनिधी शिष्टमंडळात होते. देशभरात सध्या मुस्लिम विरोधी घटना घडत आहेत. राम नवमीला महाराष्ट्र, बिहार व बंगाल येथे हिंसाचार झाला. बिहार येथील एका मदरशाला आग लावण्यात आली. हरियाणा येथे जुनैद व नासिर यांना जिवंत जाळण्यात आले, या सर्व घटनांची माहिती शिष्टमंडळाने मंत्री शाह यांना दिली.

- Advertisement -

भाजप नेते मुस्लिम द्वेषी वक्तव्य करत आहेत. यावर सरकार काहीच बोलत नाही. अशा घटनांमध्ये सरकारने घेतलेले मौन मुस्लिम समाजाला वेदना देणारे ठरते, असे सांगत शिष्टमंडळाने मुस्लिम समाजाच्या समस्यांच्या माहिती मंत्री शाह यांना दिली. तसेच कर्नाटक येथे पसमांदा मुस्लमानांचे आरक्षण बंद करण्यात आला आहे, याकडेही शिष्टमंडळाने मंत्री शाह यांचे लक्ष वेधले. त्यावर मंत्री शाह यांनी वरील इशारा दिला. जमावाकडून हत्या केली जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. अशा प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल. भडकाऊ भाषण करणाऱ्यांवरही कारवाई होईल, असे आश्वासन मंत्री शाह यांनी शिष्टमंडळाला दिले.

समलैंगिक विवाह, समान नागरि कायदा याबाबतही बैठकीत चर्चा झाली. समान नागरिक कायद्यासंदर्भात शिष्टमंडळाने मंत्री शाह यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण याप्रकरणावर काहीही बोलण्यास मंत्री शाह यांनी नकार दिला. याआधी मुस्लिम नेत्यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचीही भेट घेतली होती. मुस्लिम विरोधी घटनांची माहिती भागवत यांनाही देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -