घरदेश-विदेशमागील सात वर्षांत अमित शहा यांच्या संपत्तीत झाली तीनपट वाढ

मागील सात वर्षांत अमित शहा यांच्या संपत्तीत झाली तीनपट वाढ

Subscribe

भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या मालमत्तेत मागील सात वर्षात तीन पट वाढ आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. शाह गांधीनगर मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. अर्ज भरतांना त्यांनी सादर केलेल्या मालमत्तेत ही माहिती समोर आली आहे.

भाजपा अध्यक्ष अमित शाह गुजरात येथील गांधीनगर मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. निवडणूक लढवण्याचा अर्ज त्यांनी नुकताच निवडणूक आयोगाकडे सोपवला आहे. अमित शाह पहिल्यांदाच या निवडणूकीत उमेदवार म्हणून लढणार आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांचे लक्ष या मतदारसंघाकडे अधिक आहे. अमित शाह यांनी शनिवारी गांधीनगर मतदारसंघातून निवडणूक अर्ज भरला. अर्ज भरताना सादर केलेल्या मालमत्तेच्या माहितीनुसार मागील सात वर्षांत शाह यांच्या एकूण मालमत्तेत तीन पटीने वाढ झाल्याची माहिती समोर आली. यामाहितीमुळे विरोधकांना अजून एक मुद्दा मिळाला आहे. या मुद्द्यामुळे विरोधक शाह यांच्यावर टीका करण्याची संधी सोडणार नसल्याचे चित्र आहे.

किती होती अमित शाह यांची संपत्ती

सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात शाह यांची एकूण संपत्तीची किंमत ३८.८१ कोटी रुपये आहे. या संपत्तीची किंमत २०१२ साली ११.७९ कोटी होती. एकूण ३८.८१ कोटी संपत्तीपैकी २३ कोटी संपत्ती त्यांना वारसा हक्काने लाभली आहे. अमित शाह आणि त्यांच्या पत्नी यांच्या बचत खात्यामध्ये २७.८० लाख रुपये आहेत. या व्यतिरिक्त या दाम्पत्याकडे एकूण ९.८० लाखाचे फिक्स डिपॉझिट आहेत. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार शाह दाम्पत्याचे वर्षीक उत्पन्न २.८४ कोटी रुपये आहे. शाह यांनी बी. कॉमचे शिक्षण पूर्ण केले नसल्याचेही या प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -