Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश बंद दाराआड पवार, शहा, पटेल गुप्त बैठकीवर अमित शहांची सूचक प्रतिक्रिया

बंद दाराआड पवार, शहा, पटेल गुप्त बैठकीवर अमित शहांची सूचक प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत अहमदाबादमध्ये गुप्त बैठक पार पडली असं वृत्त समोर आलं आहे. यावर अमित शहा यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषदेत पवारांसोबत बैठक झाली का यावर सर्व गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात असं म्हणत सूचक प्रतिक्रिया दिली. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मालिकब्या चर्चा अफवा असल्याचं म्हटलं आहे. मात्र अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत भेट झाल्याचं नाकारलं नाही त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बंद दाराआड बैठक झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. महाराष्ट्रातील राजकीय समिकरण बडणार अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. मात्र अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत सूचक वक्तव्य केलं. सर्व गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात, असं सूचक विधान अमित शहा यांनी केलं.

- Advertisement -

शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे काही निवडक ज्येष्ठ नेते शुक्रवारी संध्याकाळी खासगी जेट विमानाने अहमदाबाद येथे गेले होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास ते अहमदाबादला पोहचले. त्यानंतर अहमदाबाद विमानतळावरून हे नेते थेट शांती आश्रम येथील एका गेस्ट हाऊसवर गेले. त्याठिकाणी अमित शहा हे काही मोजक्या भाजप नेत्यांबरोबर आधीच हजर होते. बंद दाराआड पवार, शहा आणि पटेल यांच्यात गुप्त बैठक झाली. तबब्ल दोन तास ही बैठक सुरू होती. दरम्यान, अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर आता चर्चांना उधाण आलं आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर अनेक आरोप झाले आहे. त्यातच मुंबईत स्फोटकांनी कार सापडल्याप्रकरणी सचिन वाझेंना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए करत आहे. तर खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडल्या होत्या. एकीकडे राज्यातील राजकारण तापलेलं असताना अमित शहा आणि आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदलणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisement -