गूगल मॅप्समध्ये लवकरच अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकू येणार

आता कंपनी नेव्हिगेशनसाठी बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा आवाज समाविष्ट करण्याचा विचार करीत आहे.

सध्याच्या काळात गुगल मॅप ड्रायव्हिंगचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. वाहन चालवताना, गूगल मॅपवरून बाईचा आवाज येतो, त्यानुसार आपण आपला मार्ग निवडतो. आता कंपनी नेव्हिगेशनसाठी बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा आवाज समाविष्ट करण्याचा विचार करीत आहे. लवकरच अमिताभ बच्चन आपला आवाज गुगल मॅपवर देऊ शकतात. सध्या गुगल मॅप नेव्हिगेशनमध्ये न्यूयॉर्कच्या कॅरेन जेकबसनचा आवाज ऐकायला येतो.

गूगल आणि अमिताभ बच्चन यांच्यात चर्चा

एका अहवालानुसार, अमिताभ बच्चन यांच्या गूगल मॅपसाठी व्हॉईसची मदत गूगल घेऊ शकते. याबद्दल अमिताभ यांच्याशी संभाषण सुरू आहे. कंपनीनेही अमिताभ यांच्याकडे संपर्क साधला आहे. अमिताभ बच्चन भक्कम आवाजासाठी ओळखले जातात. त्यांचा आवाज हा देशात सर्वाधिक पसंतीचा आवाज आहे. अमिताभचा आवाज गूगल मॅप नेव्हिगेशनसाठी एक चांगला पर्याय असू शकतो. सध्या याची पुष्टी अमिताभ बच्चन आणि गूगल यांनी केली नाही.