समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याकरता उमेश कोल्हेची हत्या, एनआयएच्या तपासात उघड

धर्माच्या आधारावर समाजात दहशत माजवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात आलं आहे. हे एक मोठं षडयंत्र असल्याचं एनआयएचं म्हणणं आहे.

national investigation agency

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा हिच्या समर्थनार्थ काही पोस्ट शेअर केल्यामुळे अमरावतीतील एका केमिस्टची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले होते. एका समाजाने षडयंत्र रचून समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (National Investigation Agency) केला आहे. (Amravati killing larger conspiracy by a group’ to promote religious enmity says NIA)

हेही वाचा – अमरावतीत उदयपूर घटनेची पुनरावृत्ती? नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ बोलल्याने केमिस्टची हत्या

राजस्थानच्या उदयपूरमध्येही अशाचप्रकारे एका टेलरची हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या काही दिवस आधीच अमरावती येथे उमेश कोल्हे या केमिस्टची हत्या झाली होती. या दोन्ही प्रकरणी एनएआय तपास करत आहे. एका समूहाने षडयंत्र रचून उमेश कोल्हेची हत्या केल्याचं एनआयएने सांगितले आहे. देशात दहशतवाद पसरवण्याचा हा प्रयत्न असल्याचंही एनआयने म्हटलं आहे. धर्माच्या आधारावर समाजात दहशत माजवण्याचा प्रयत्न असल्याचंही सांगण्यात आलं आहे. हे एक मोठं षडयंत्र असल्याचं एनआयएचं म्हणणं आहे.

हेही वाचा – अमरावती केमिस्ट हत्येप्रकरणी पोलीस आयुक्तांवर कारवाई करा; खासदार नवनीत राणांचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

2 जुलै रोजी, एनआयएने केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी बेकायदा प्रतिबंध कायदा 1967 आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 16, 18 आणि 20 अंतर्गत पुन्हा गुन्हा नोंदवला. एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे की, अमरावती येथील कोतवाली पोलीस ठाण्यात 21 जून रोजी कोल्हेच्या निर्घृण हत्येची माहिती मिळाली आणि मृताचा मुलगा संकेत कोल्हे याच्या तक्रारीवरून 22 जून रोजी तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अमरावतीच्या घनश्याम नगर भागात राहणारे कोल्हे हे दुकानातून घरी परतत असताना रात्री दहाच्या सुमारास त्यांची हत्या करण्यात आली.

हेही वाचा – अमरावती हत्याकांडाचा मास्टरमाईंडला नागपूरमधून अटक, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हत्येचा तपास

तपासात समोर आलेल्या तथ्यांनुसार, आयपीसीच्या कलम १५३ (अ), १५३ (बी) आणि १२० (बी) आणि यूए (पी) कायद्याच्या कलम १६, १८ आणि २० अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. 1 जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याचे आदेश दिले होते.

कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी मुदस्सीर अहमद, शाहरुख पठाण, अब्दुल तौफिक, शोएब खान, अतीब रशीद, युसूफ खान बहादूर खान आणि शाहीम अहमद फिरोज अहमद यांना अटक करण्यात आली आहे. NIA ने बुधवारी या प्रकरणी 13 ठिकाणी झडती घेतली आणि विविध कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.