घरदेश-विदेशपंजाबमध्ये इंटरनेट सेवा खंडित, अमृतपालप्रकरण चिघळण्याची शक्यता

पंजाबमध्ये इंटरनेट सेवा खंडित, अमृतपालप्रकरण चिघळण्याची शक्यता

Subscribe

चंदीगढ – अजनाला पोलीस ठाण्यावरील हल्ल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी शनिवारी वारिस पंजाब डेचे प्रमुख अमृतपाल सिंग याच्यासह त्याच्या सहा साथीदारांना शस्त्रांसह ताब्यात घेतले. अमृतपालच्या अटकेमुळे सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे रविवारपर्यंत येथील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. अमृत पाल सिंह याच्याविरोधात तेढ निर्माण केल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे पोलीस त्याच्यावर कारवाई करत आहेत.

अमृतपाल सिंगच्या सहा साथीदारांना जालंधरच्या महतपूर परिसरात ताब्यात घेण्यात आले होते. यादरम्यान अमृतपाल पोलिसांच्या हातून निसटला. तसंच, अमृतपालचा सहकारी भगवंत सिंह बाजके याच्याही मागावर पोलीस आहेत. अखेर तो पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.

- Advertisement -

तत्पूर्वी भटिंडा येथील रामपुरा फूल येथे ठेवलेले अमृतपाल यांचे कार्यक्रमही रद्द करण्यात आले होते. अमृतपाल साडेनऊ वाजता तेथे पोहोचणार होते, मात्र ते न पोहोचल्याने मंचावरून कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा करण्यात आली.

काय प्रकरण आहे?

- Advertisement -

रुपनगर जिल्ह्यातील चमकौर साहिब येथील वरिंदर सिंग यांनी लवप्रीत सिंग आणि अमृतपाल यांच्यासह त्यांच्या ३० समर्थकांचे अपहरण आणि प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यामुळे पोलिसांनी लवप्रीत आणि अन्य आरोपींना अटक केली. यातील एका आरोपीला पोलिसांनी आधीच सोडले होते, मात्र लवप्रीतला सोडवण्यासाठी अमृतपालने पोलिस स्टेशनबाहेर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. अमृतपाल आपल्या समर्थकांसह श्री गुरु ग्रंथ साहिब यांचे पवित्र रूप घेऊन पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता संतप्त जमावाने बॅरिकेड्स तोडून पोलिस ठाण्यावर तलवारी आणि बंदुकींनी हल्ला केला, यात एसपीसह सहा पोलिस जखमी झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -