घरताज्या घडामोडीफरार अमृतपाल सिंगला अखेर अटक, मोगा पोलिसांसमोर केलं आत्मसमर्पण

फरार अमृतपाल सिंगला अखेर अटक, मोगा पोलिसांसमोर केलं आत्मसमर्पण

Subscribe

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला पकडण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. अमृतपाल सिंगने मोगा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. पंजाब पोलिसांनी त्याला मोगाच्या रोडेवाल गुरुद्वारातून अटक केली आहे. या संदर्भात पंजाब पोलिसांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपाल सिंगला अमृतसरला नेण्यात आले असून त्याची थेट आसाममधील दिब्रुगड तुरुंगात रवानगी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

१८ मार्चपासून अमृतपाल सिंग फरार होता. अमृतपाल सिंगने त्याची संघटना ‘वारीस पंजाब दे’च्या सदस्यांसह पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र अमृतपाल सिंग फरार झाला होता. त्यानंतर वेषांतर करत तो पोलिसांना चकवा देत होता. पण अखेर त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.

अमृतपालला पकडण्यासाठी पंजाब पोलिसांनी नेपाळच्या सीमारेषेपर्यंत कारवाई केली होती. पण पोलिसांना त्याला पकडण्यात यश आलं नव्हतं. यादरम्यान अमृतपाल सिंगने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक व्हिडीओ देखील जारी केले होते. अमृतपालला पकडण्यात अपयशी ठरत असल्याने पंजाब हरियाणा कोर्टानेही पोलिसांना फटकारलं होतं.

- Advertisement -

२३ फेब्रुवारीला अमृतपाल सिंग चर्चेत आला होता. त्याने आपल्या काही सहकाऱ्यांना सोडवण्यासाठी हजारो समर्थकांसह अजनाला पोलीस स्थानकावर हल्ला केला होता. यामध्ये सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.


हेही वाचा : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अदर पूनावलांचे मोठे विधान; म्हणाले…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -