Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Amritpal Singh : सहकारी पप्पलप्रीतला अटक, NSA अंतर्गत होणार कारवाई

Amritpal Singh : सहकारी पप्पलप्रीतला अटक, NSA अंतर्गत होणार कारवाई

Subscribe

नवी दिल्ली : खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगचा (Amritpal Singh) सहकारी पप्पलप्रीत सिंगला (Pappalpreet Singh) दिल्ली आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त कारवाईने (Joint operation of Delhi and Punjab Police) अटक पोलिसांना यश मिळाले आहे. पप्पलप्रीत सिंग 18 मार्चपासून फरार होता. काही दिवसांपूर्वी अमृतपाल आणि पप्पलप्रीत एका व्हायरल फोटोमध्ये एकत्र दिसले होते. पंजाब पोलिसांचे आयजीपी सुखचेन सिंग गिल (Sukhchen Singh Gill) यांनी सांगितले की, पप्पलप्रीत सिंगला अमृतसरच्या काथू नांगल परिसरातून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर एनएसए अंतर्गत कारवाई होणार आहे.

- Advertisement -

अमृतपाल सिंगचा जवळचा सहकारी पप्पलप्रीत सिंग मार्च महिन्यापासून फरार होता. तो एप्रिलच्या सुरुवातीला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला होता. या फुटेजनुसार तो होशियारपूरमधील तनौली गावाजवळील डेरामध्ये दिसला होता. हे फुटेज 29 मार्चचे सांगितले जात होते, मात्र एका दिवसानंतर पंजाब पोलिसांच्या काउंटर इंटेलिजन्स विंगच्या (Counter Intelligence Wing) पथकाने फगवाडा येथून टोयोटा इनोव्हा गाडीचा पाठलाग केला होता. या गाडीतून अमृतपाल आणि पप्पलप्रीत प्रवास करत असल्याचा पोलिसांना संशय होता. या गाडीचे फुटेज नंतर समोर आले तेव्हा ते ‘डेरा’ मारनिया गावापासून अवघ्या दोन ते तीन किमी अंतरावर असलेल्या गावात होते. या दोघांच्या शोधासाठी पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली होती.

बैसाखी उत्सवादरम्यान अमृतपाल सिंगच्या आत्मसमर्पणाच्या अफवांपूर्वी पंजाब पोलिसांनी संपूर्ण पंजाबमध्ये आपली दक्षता वाढवली आहे. पप्पलप्रीत सिंगला अटक करण्यात आल्यामुळे अमृतपाल सिंगच्या जवळ जाण्यासाठी पोलिसांना उपयुक्त ठरणार आहे.

- Advertisement -

अमृतपाल सिंगच्या कटात पाकिस्तानचा हात
पंजाबचे पोलीस प्रमुख गौरव यादव यांनी सोमवारी (10 एप्रिल) सुवर्ण मंदिराला भेट दिली. तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, अपराधी लोकांना पोलीस पकडतील, मात्र अशा लोकांनी कायद्यापुढे शरणागती पत्करली तर बरे होईल. या संपूर्ण कटामागे पाकिस्तानचा हात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -