घरताज्या घडामोडीपोलिसांचा ससेमिरा असतानाच खालिस्तान समर्थक अमृतपाल सिंगचा पहिला व्हिडीओ समोर, म्हणाला...

पोलिसांचा ससेमिरा असतानाच खालिस्तान समर्थक अमृतपाल सिंगचा पहिला व्हिडीओ समोर, म्हणाला…

Subscribe

खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंग अद्यापही फरार आहे. पंजाब, दिल्ली, हरियाणाची पोलीस अमृतपाल सिंगचा शोध घेत आहेत. अशातच अमृतपाल सिंगचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये '18 मार्चनंतर मी पहिल्यांदाच आमनेसामने येत आहे.

खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंग अद्यापही फरार आहे. पंजाब, दिल्ली, हरियाणाची पोलीस अमृतपाल सिंगचा शोध घेत आहेत. अशातच अमृतपाल सिंगचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ’18 मार्चनंतर मी पहिल्यांदाच आमनेसामने येत आहे. सरकारला अटक करायची असती तर घरातून अटक करता आली असती, पण माझी अटक परमेश्वराच्या हाती आहे, असे अमृतपालने म्हटले आहे. (Amritpal Singh Video Khalistan Supporter Amritpal Released First Video Message On Facebook)

पोलिसांच्या कारवाईनंतर 11 दिवसांनी अमृतपाल सिंगचा फेसबुकवर व्हिडीओ शेअर करण्यात आला असून यामध्ये एक संदेश दिला आहे. या व्हिडीओमध्ये अमृतपाल सिंग म्हणाला की, ‘तो पुर्णपणे बरा आहे. सरकारने असहाय्य लोकांना तुरुंगात टाकले आहे. प्रशासनाने आमच्या सोबत असलेल्यांना आसामला पाठवले आहे. एनएसए लोकांवर लादण्यात आले आहे. पोलिसांनी सक्ती केली. हा दडपशाही आहे. याविरोधात आवाज उठवणे हा आपला राष्ट्रीय हक्क आहे. बराच काळ आमचा समुदाय क्षुल्लक मुद्द्यांवरून भांडत आहे’.

- Advertisement -

अमृतपाल याने श्री अकाल तख्त साहिबच्या जथेदारांना बैसाखीच्या दिवशी सरबत खालसा बोलावण्यास सांगितले. तसेच, ‘सरबत खालसामध्ये देश-विदेशातील शीख मंडळींनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि तेथे समुदायाच्या समस्यांवर चर्चा केली जाईल’, असे अमृतपाल म्हणाला. या व्हिडीओमध्ये अमृतपालने चिथावणीखोर गोष्टीही केल्या असल्याचे पाहायला मिळते.

अमृतपालचा व्हिडिओ संदेश ताजा आहे. व्हिडिओमध्ये त्याने शाल गुंडाळली आहे. ही तीच शाल आहे जी पापलप्रीत सिंगच्या हातात दिसली होती. विशेष बाब म्हणजे अमृतपाल यांच्या संदेशात श्री अकाल तख्त साहिबचे जथेदार ग्यानी हरप्रीत सिंह यांच्या 24 तासांच्या अल्टिमेटमचाही उल्लेख आहे.

- Advertisement -

प्रत्यक्षात सोमवारी जथेदार ग्यानी हरप्रीत सिंह यांनी पंजाब सरकारला 24 तासांत सर्व शीख तरुणांची सुटका करण्याचे अल्टिमेटम दिले होते. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी यावर जोरदार प्रतिक्रिया दिली. त्यांनी जथेदारांना राजकारणापासून दूर राहण्याचा सल्लाही दिला होता.

सरबत खालसा म्हणजे काय?

सरबत खालसा म्हणजे देश-विदेशातील सर्व शीख संघटना सहभागी होतात. सर्व पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करतात. या बैठकीत धर्माशी संबंधित विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेतले जातात. संपूर्ण शीख समाजाला एकाच ठिकाणी एकत्र आणणे हा सरबत खालशाचा उद्देश आहे. अमृतपाल यांनी बैसाखीच्या दिवशी सर्व धार्मिक संघटनांना हेच सांगितले आहे.


हेही वाचा – भडकाऊ भाषणावरून सुप्रीम कोर्टाचे शिंदे-फडणवीस सरकारला आदेश, वाचा सविस्तर…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -