‘अमूल’ला जीएसटीचा फटका! दूध, दही, लस्सीच्या दरात केली वाढ

केंद्र सरकारने जीएसटीच्या दरात केलेल्या वाढीनंतर 19 जुलैपासून उत्पादने महाग झाली आहेत, तसेच कंपनीने आपल्या सर्व उत्पादनांच्या दरांमध्ये सुधारणा केली आहे

amul hike curd, milk, buttermilk, lassi and dairy products due to 5 percent gst

देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. यात केंद्र सरकारने आता जीएसटीच्या दरातही वाढ केली आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर आता अनेक कंपन्यांनी उत्पादनांचे दर वाढवले आहेत. दरम्यान अमूल कंपनीनेही फ्लेवर्ड दूध, दही, लस्सी आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीत वाढ केली आहे. यामुळे ग्राहकांना आता अमूल उत्पादनांसाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. अमूल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले की, सरकारने जीएसटी दरात वाढ केल्याने उत्पादनांच्या किमती वाढल्या आहेत. याशिवाय लहान पॅकेट्सच्या किमतीवरील वाढता दर आता कंपनी स्वतः सहन करेल.

केंद्र सरकारने जीएसटीच्या दरात केलेल्या वाढीनंतर 19 जुलैपासून उत्पादने महाग झाली आहेत, तसेच कंपनीने आपल्या सर्व उत्पादनांच्या दरांमध्ये सुधारणा केली आहे. कंपनीने म्हटले की, हे नवीन दर 19 जुलै 2022 पासून लागू झालेत. केंद्र सरकारने पॅकबंद उत्पादनांवर 5 टक्के जीएसटी लागू केल्याने किंमती वाढल्या आहेत. कंपनीने 200 ग्रॅम दह्याचा दर 20 वरून 21 रुपये झाला आहे. याशिवाय 170 मिली अमूल लस्सीसाठी ग्राहकांना 10 रुपयांऐवजी आता 11 रुपये मोजावे लागणार आहे.

तर 200 ग्रॅम दह्याची किंमत 40 रुपयांवरून 42 रुपये करण्यात आली आहे. त्याचबरोबर अमूल दही पॅकेटच्या दर 30 रुपयांवरून 32 रुपये करण्यात आला आहे. त्याचवेळी एक दह्याचे पॅकेट 65 रुपयांवरून 69 रुपये झाले आहे.

अमूल दुधाच्या दराबद्दल बोलायचे झाल्यास, आता 20 रुपयांच्या दुधाच्या पॅकेटसाठी 22 रुपये मोजावे लागणार आहे, तर मठ्ठ्याचा ट्रेटा पॅक आता 12 रुपयांवरून 13 रुपये झाला आहे.


भारतीय नागरिकत्व सोडून नागरिक ‘या’ देशांत होतायत स्थायिक; 48 जणांनी पाकिस्तानला केलं जवळ