घरताज्या घडामोडीAmul Milk Price Hike : 1 मार्चपासून अमूल दूध 2 रुपयांनी महागणार

Amul Milk Price Hike : 1 मार्चपासून अमूल दूध 2 रुपयांनी महागणार

Subscribe

१ मार्चपासून देशभरात अमूल दूध २ रुपयांनी महाग होणार आहे. अहमदनगर आणि गुजरातच्या बाजारात अमूल गोल्ड दूधाची किंमत ३० रुपये प्रति ५०० मिलीलीटर तर अमूल ताजा २४ रुपये ५०० मिलीलीटर असणार आहे. त्याचप्रमाणे अमूल शक्ती २७ रुपये प्रति ५०० मिलीलीटर मिळणार आहे.

Amul Milk Price Hike : देशभरात मागच्या काही महिन्यांपासून पेट्रोल डिझेलच्या किंमती दररोज वाढत असताना आता दुसरीकडे अमूलने देखील देशभरातील मार्केटमधील दूधाच्या किंमती वाढवल्या आहेत. १ मार्चपासून देशभरात अमूल दूध २ रुपयांनी महाग होणार आहे. अहमदनगर आणि गुजरातच्या बाजारात अमूल गोल्ड दूधाची किंमत ३० रुपये प्रति ५०० मिलीलीटर तर अमूल ताजा २४ रुपये ५०० मिलीलीटर असणार आहे. त्याचप्रमाणे अमूल शक्ती २७ रुपये प्रति ५०० मिलीलीटर मिळणार आहे.

गुजरात सहकारी दूध विपणन संघ ( GCMMF ) ने एक वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच अमूल दूधाच्या किंमती वाढवल्या आहेत. याआधी जुलै २०२१मध्ये दूधाच्या किंमती वाढवल्या होत्या. या वाढलेल्या किंमतीचा प्रभाव अमूल दूधाच्या इतर ब्रँडवर देखील झाला. ज्यात सोना, ताजा, शक्ती, टी स्पेशल त्याचप्रमाणे गाय आणि म्हशीच्या दुधांचा समावेश आहे. जवळपास ७ महिने २७ दिवसांनी पुन्हा एकदा अमूल दूधाच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने दूधाच्या किंमती वाढवण्यात आल्याचे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले आहे.

- Advertisement -

GCMMF च्या म्हणण्यानुसार, मागील २ वर्षात अमूलने त्यांच्या ताजा दूध क्षेणीतील दूधाच्या किंमती वाढवल्यानंतर प्रति वर्षी केवळ ४ टक्के वाढ झाली. पॅकेजिंग, लॉडिस्टिक्स आणि जनावरांच्या चाऱ्याच्या किंमतीत वाढल्या आहेत. त्यामुळे दूध हाताळणी, उत्पादनाचा एकूण खर्चही वाढला आहे. ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशातून प्रत्येकी १ रुपयातून जवळपास ८० पैसे कंपनी दुग्ध उत्पादकांना वाटते. त्यामुळे आता दूधाच्या किंमती वाढल्याने दूध उत्पादकांना पशुपालन करण्यास प्रोत्साहन मिळेल त्याचप्रमाणे त्यांना मदत देखील होईल.


हेही वाचा – LIC IPO Pan Link: LIC IPO साठी तुमच्या पॉलिसीबरोबर पॅन करा अपडेट अन्यथा…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -