नवी दिल्ली : बंगळुरू ते सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाच्या उड्डाणात काही तांत्रिक बिघाड. यामुळे एअर इंडियाचे हे विमान अलास्काच्या दिशेने वळवण्यात आले आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. या विमानात पायलटसह 280 प्रवासी प्रवास करत होते.
एअर इंडिया दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया 175 हे विमान पुन्हा उड्डाण घेऊन सॅन फ्रान्सिस्कोच्या दिशेने रवाना झाले असून या विमानेच सॅन फ्रान्सिस्कोमध्ये सुरक्षित लँडिंग देखील झाले आहे. एअर इंडियाने हे विमान B777 असून हे सॅन फ्रान्सिस्कोच्या दिशेने जात असताना काही तांत्रिक बिघाड झाला. यामुळे एअर इंडियाचे विमान अलास्कातील अँकरेज या शहराच्या दिशेने वळवण्यात आले.
हेही वाचा – 2023 मधील उरलेले 4 महिने घातक; बाबा वेंगाची धक्कादायक भविष्यवाणी
या विमानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी तब्बल चार तास लागले. यानंतर विमानाने पुन्हा सॅन फ्रान्सिस्कोच्या दिशेने उड्डाण केले. यापूर्वी 29 एप्रिल रोजी खराब वातावरणामुळे सिंगापूरला जाणारे एअर इंडियाचे विमानाचा मार्ग ही वळविला होता. तसेच एअर इंडियाटे विमान AI346 हे देखील मलेशियाच्या दिशेने वळविले होते. हवामानात सुधारणा झाल्यानंतर विमान पुन्हा उड्डाण केले.