घरदेश-विदेशअमेरिकेच्या मोठ्या कंपनीकडून दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज; भारतातील व्यवसायावर होणार परिणाम?

अमेरिकेच्या मोठ्या कंपनीकडून दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज; भारतातील व्यवसायावर होणार परिणाम?

Subscribe

नवी दिल्ली : अमेरिकेतील सर्वात मोठ्या कंपनीपैकी एक असलेल्या WeWork कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. कंपनीने दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज केला आहे. कंपनीने सोमवारी (6 नोव्हेंबर) न्यू जर्सी न्यायालयात दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. एकेकाळी $47 अब्ज एवढी निव्वळ संपत्ती असलेल्या कंपनीचे दायित्व आता $10 बिलियन वरून $50 बिलियन झाले आहे, ज्याची परतफेड कंपनी करू शकत नाही. या वर्षी कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 96 टक्क्यांनी घसरण झाली आहे. सध्या कंपनी कर्ज आणि प्रचंड तोट्यात असल्याचे समजते. (An application to declare bankruptcy by a large US company The impact on business in India)

हेही वाचा – केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाचे खाण व्यवसायिकांसोबत कोट्यवधींचे व्यवहार; व्हिडीओ व्हायरलनंतर काँग्रेस आक्रमक

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, WeWork कंपनीने 2019 मध्ये सार्वजनिक होण्याची घोषणा केली होती. त्यानंतर दीर्घ मुदतीच्या भाडेतत्त्वावर जागा घेऊन ती अल्प मुदतीसाठी भाड्याने देण्याचे व्यावसायिक मॉडेल स्वीकारल्यामुळे कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली. खरंतर तेव्हापासून कंपनीत गोंधळ सुरू होता.

- Advertisement -

कोरोनाच्या कालावधीनंतर लोक घरून काम करू लागले. आजही अनेक कंपन्यांचे कर्मचारी घरून काम करत आहेत. अशा परिस्थितीत कंपन्यांनी जागेसाठी WeWork सोबतचा करार रद्द केला. त्यामुळे गुंतवणूक जास्त असतानाही कंपनीचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे कंपनीला तोटा सहन करावा लागला. त्यानंतर कंपनीने अनेक देशांमधील आपली केंद्रे बंद केली. त्यामुळे त्या केंद्रातील कर्मचाऱ्यांनाही कामावरून कमी करावे लागले. पण तरीदेखील कंपनीला फायदा झाला नाही. त्यामुळे कंपनीने दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज केला आहे.

हेही वाचा – सनातन धर्माची तुलना डेंग्यू-मलेरियाशी करणाऱ्या उदयनिधींचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; काय म्हणाले?

भारतातील व्यवसायावर परिणाम होणार?

दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर WeWork India चे निवेदन समोर आले आहे. WeWork India ने म्हटले की, कंपनीला दिवाळखोर घोषित केल्यानंतर WeWork India च्या व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण कंपनीच्या भारतातील व्यवसायात सातत्याने वाढ होत आहे. WeWork India मध्ये समूहाचा 73 टक्के हिस्सा आहे, तर WeWork ग्लोबलचा 27 टक्के हिस्सा आहे. सध्या नवी दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, मुंबई, बेंगळुरू, पुणे आणि हैदराबाद अशा भारतातील 7 शहरांमध्ये WeWork India ची 50 केंद्रे आहेत. जून 2023 च्या तिमाहीत कंपनीचा भारतातील महसूल 40 टक्क्यांनी वाढून 400 कोटी रुपये झाला असल्याचे WeWork India ने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -