Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश भारतीय वंशाच्या तरुणाकडून जो बायडेन यांना मारण्याचा प्रयत्न, हिटलरच्या विचाराने आहे प्रभावित

भारतीय वंशाच्या तरुणाकडून जो बायडेन यांना मारण्याचा प्रयत्न, हिटलरच्या विचाराने आहे प्रभावित

Subscribe

नवी दिल्ली : अमेरिकेत भारतीय वंशाच्या तरुणावर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना मारण्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याने व्हाईट हाऊसजवळील सुरक्षा अडथळ्याला ट्रकने अनेक वेळा धडक दिली. त्याला मंगळवारी (23 मे) अटक करण्यात आली. यावेळी त्याच्या ट्रकमधऊन अनेक नाझींचे झेंडे सापडल्यामुळे तो जर्मन हुकूमशहा हिटलरचा प्रभाव असल्याचे सांगण्यात येत आहे. (Indian-origin youth Sai Varshith Kandula attempt to kill Joe Biden by influenced Hitler’s thinking)

साई वर्षित कंदुला (Sai Varshith Kandula) असे 19 वर्षीय तरुणाचे नाव आहे. या तरुणाने अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी मधील व्हाईट हाऊसजवळ लफायेट स्क्वेअर हे अनेक एकरांवर पसरलेले उद्यानाच्या एका बाजूला असलेल्या अनेक सुरक्षा अडथळ्यांना मंगळवारी रात्री धडक दिली. या घटनेबाबत अमेरिकेतील अनेक वृत्तसंस्थांनी दुजोरा दिला आहे. प्रत्यक्षदर्शी ख्रिस जाबोजी  यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्याने सांगितले की, पायी घरी जात असताना लाफायेट स्क्वेअरजवळ एका ट्रकच्या धडकेचा मोठा आवाज ऐकू आला. वाहन थेट व्हाईट हाऊसजवळील बॅरिकेडमध्ये घुसले होते. यानंतर अमेरिकन पोलीस आणि सीक्रेट सर्व्हिस सक्रिय झाली. जवळचे हॉटेल रिकामे करण्यात आले आणि उद्याना जवळील रस्ते बंद करण्यात आले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

- Advertisement -

या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी साई वर्षित कंदुलाला आरोपी म्हणून अटक केली. अमेरिकन पोलिसांनी वर्षित हा नाझींचा चाहता असल्याचे सांगितले आहे. त्याला अनेक महिन्यांपासून अमेरिकन सरकारकडून सत्ता आपल्या हातात घ्यायची होती. वर्षितने सीक्रेट सर्व्हिसला दिलेल्या निवेदनात म्हटले की, व्हाईट हाऊसमध्ये घुसून सत्ता आपल्या हातात घेण्याचा त्यांचा हेतू होता. त्याने अधिकाऱ्यांना असेही सांगितले की, सत्ता आपल्या हातात घेण्यासाठी राष्ट्रपतींना मारावे लागले तर तेही करायला तो तयार आहे. त्याने असेही सांगितले की त्याला नाझींचा इतिहास, त्यांचा हुकूमशाही स्वभाव आणि जागतिक सरकारची कल्पना आवडते. यासाठी त्याने ऑनलाइन नाझी ध्वज खरेदी केले होते.

- Advertisement -

ट्रक भाड्याने घेतला
वर्षितने व्हर्जिनिया राज्यातून यू-हॉल ट्रक भाड्याने घेतला होता. यू-हॉल ही यूएस मधील ट्रक भाड्याने देणारी कंपनी आहे. त्याने सांगितले की, 18 वर्षावरील कोणतीही व्यक्ती त्यांच्याकडून ट्रक भाड्याने घेऊ शकते. वर्षितच्या नावावर ट्रक भाड्याने घेण्याचा वैध करार करण्यात आला आहे. त्याच्यावर याआधी कोणतीही पोलीस रेकॉर्ड नाही आहे किंवा ट्रकसोबत  कोणत्याही अपघाताची तक्रार नसल्यामुळे त्याला ट्रक करार करून भाड्याने देण्यात आला.

- Advertisment -