घरदेश-विदेशखाद्यतेल स्वस्त, खाद्य तेलाच्या दरात प्रति लिटर सरासरी 20 रुपयांची कपात

खाद्यतेल स्वस्त, खाद्य तेलाच्या दरात प्रति लिटर सरासरी 20 रुपयांची कपात

Subscribe

प्रमुख खाद्यतेल उत्पादक कंपन्यांनी खाद्य तेलाच्या किंमती कमी केल्या आहेत. सूर्यफुल आणि सोयाबीन तेलाच्या प्रति लिटर सरासरी 20 रुपयांची कपात केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत कपात झाल्यानंतर नवीन दर लवकरच लागू होणार आहेत. ही दर कपात सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे. यामुळे किचन बजेटमध्ये गृहिणींना आणि हॉटेल चालकांना दिलासा मिळणार आहे.

या कपन्यांनी केली दरात कपात –

- Advertisement -

प्रमुख खाद्यतेल उत्पादक कंपन्या अदाणी विल्मर आणि रुची इंडस्ट्रीज यांच्यासह जेमिनी एडिबल्स अँड फॅट्स इंडिया, मोदी नॅचरल्स, गोकुळ री-फॉयल अँड सॉल्वेंट, विजय सॉल्वेक्स, गोकुळ अॅग्रो रिसोर्सेज आणि एन. के. प्रोटीन या तेल उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या दरात कपात केली आहे.

तेलाच्या मागणीत वाढ – 

- Advertisement -

पाम तेलाच्या किंमतीत प्रति लिटर 7 ते 8 रुपयांची घसरण झाली आहे. सूर्यफुल तेलाच्या किंमतीत 10 ते 15 रुपये प्रति लिटर तर सोयाबीन तेलाच्या किंमतीत 5 रुपये प्रति लिटर कपात झाल्याची माहिती इंडियन वेजिटेबल ऑयल प्रोडयुसर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर राव यांनी दिली. किंमतीत घसरण झाल्याने तेलाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. किंमती घसरण्याचा थेट फायदा किरकोळ बाजारात दिसून येईल.

जेमिनी कंपनीने केली होती कपात – 

हैद्राबाद येथील जेमिनी कंपनीने आठवड्यापूर्वी फ्रीडम सनफ्लॉवर तेलाच्या दरात कपात केली होती. त्यांनी एक लिटर तेलाच्या एमआरपीमध्ये 15 रुपयांची कपात केली होती. त्यामुळे आता तेलाच्या किंमती 220 रुपये आहेत. या आठवडयात तेलाच्या किंमती 20 रुपयांनी घसरल्यावर एक लिटरचे पाऊच 200 रुपयांना मिळनार आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -