घरताज्या घडामोडीराजकोट, सौराष्ट्रच्या बर्‍याच भागात भूकंपाचे धक्के!

राजकोट, सौराष्ट्रच्या बर्‍याच भागात भूकंपाचे धक्के!

Subscribe

गुजरातमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गुरुवारी सकाळी ७.४०  वाजता राजकोट आणि सौराष्ट्रच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ४.८  मोजली गेली आहे. भूकंपाचे केंद्रस्थान राजकोटपासून २२  कि.मी. अंतरावर होते. भूकंपाचे धक्के जाणवताच लोकं घराबाहेर पडली.

- Advertisement -

जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे अद्याप समजले नाहीये. राज मिशनच्या आयपी मिशन स्कूल आणि बॉम्बे हाऊसिंग सोसायटी येथे भूकंपाचे धक्के बसल्यानंतर लोक घाबरून घराबाहेर आले.

या आधी सौराष्ट्रापूर्व गुजरातच्या कच्छ भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. गेल्या काही दिवसांत भूकंपाचे धक्के बर्‍याच वेळा जाणवले. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. गुजरातशिवाय दिल्ली-एनसीआर, जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

- Advertisement -

अंदमान निकोबारमध्ये १३ जुलैला रात्री उशिरा ४.३ तीव्रतेचा भूकंप जाणवला होता. अंदमान निकोबारमधील डिजलीपूर येथे दुपारी अडीचच्या सुमारास भूकंप झाला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अशी माहिती राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने दिली.


हे ही वाचा – ये बात! नेटफ्लिक्सवर ‘हे’ दहा चित्रपट होणार प्रदर्शित


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -