बिल गेट्स भारतातील रस्त्यांवर ई-रिक्षा चालवतानाचा VIDEO आनंद महिंद्रांनी केला शेअर

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Bill-Gates-Riding-E-Rickshaw

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक त्यांचं कौतुक करत आहेत. या व्हिडीओमध्ये बिल गेट्स महिंद्राची ई-रिक्षा ट्रेओ चालवताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये बिल गेट्स एकदम मस्तमौला अंदाजमध्ये दिसत आहेत. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये किशोर कुमार आणि मन्ना डे यांचे ‘बाबू समझो ईशारे, हॉर्न पुकारे, पम पम पम’ हे गाणे ऐकू येत आहे.

या व्हिडीओमध्ये बिल गेट्स सुरूवातीला ई-रिक्षाच्या आरशात बघून हसताना दिसतात. त्यानंतर व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये किशोर कुमार आणि मन्ना डे यांचे ‘बाबू समझो ईशारे, हॉर्न पुकारे, पम पम पम’ हे गाणं सुरू होतं. बिल गेट्स कारचे हँडल पकडून रस्त्यावर ई-रिक्षा चालवताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये या इलेक्ट्रिक वाहनाचे कौतुक करताना त्यांनी लिहिले आहे की, “याला तीन चाके आहेत, धूर नाही, आवाज नाही. शेतीपासून वाहतुकीपर्यंत महिंद्राची ट्रायो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Bill Gates (@thisisbillgates)

व्हिडीओला कॅप्शन देताना गेट्सने लिहिले की, इनोवेशनसाठी भारताची चिकाटी पाहून आपण थक्क होतो. मी इलेक्ट्रिक रिक्षा चालवली, जी 131 किमी (सुमारे 81 मैल) पर्यंत प्रवास करण्यास सक्षम आहे आणि 4 लोकांना घेऊन जाते. महिंद्रासारख्या कंपन्यांनी वाहतूक उद्योगाच्या डीकार्बोनायझेशनमध्ये दिलेले योगदान पाहणे प्रेरणादायी आहे.

दुसरीकडे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर बिल गेट्सचा ई-रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘चलती का नाम बिल गेट्स की गाडी’, तुम्हाला ट्रायो चालवताना पाहून खूप आनंद झाला. पुढच्या वेळी तुमचा भारतात येण्याचा उद्देश इलेक्ट्रिक थ्री व्हीलर रेस असावी, ज्यामध्ये तुम्ही, मी आणि सचिन तेंडुलकर असू.

महिंद्रा ट्रेओ ही 7.37kWh ची लिथियम आयन बॅटरी असलेली 4 सीटर ई-रिक्षा आहे. या महिंद्रा ई-रिक्षाची सर्टिफाइड रेंज 170 किलोमीटर आहे आणि ती 45 किमी/तास वेगाने धावू शकते.