घरताज्या घडामोडीमहिलेनं ९ सेकंदात केली शर्टाची घडी, आनंद महिंद्राही पाहून झाले थक्क

महिलेनं ९ सेकंदात केली शर्टाची घडी, आनंद महिंद्राही पाहून झाले थक्क

Subscribe

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे सर्वात मोठे उद्योगपती असून सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. हे नेहमी त्यांच्या अकाऊंटवरून मजेशीर आणि विविध प्रकारचे व्हिडीओ किंवा फोटो शेअर करत असतात. तसेच फॉलोअर्स देखील आनंद महिंद्रांच्या पोस्टची आतुरनेते वाट पाहत असतात. परंतु आता त्यांनी एका महिलेचा शर्टाला घडी केल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचप्रमाणे हा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्राही थक्क झाले आहेत.

आनंद महिंद्रांनी एक व्हिडीओ ट्विटवरून शेअर केला आहे. त्यामध्ये एका महिलेने ९ सेकंदात शर्टाची घडी घातली आहे. त्यात एक महिला ३ सोप्या स्टेप्स फॉलो करत शर्टाची घडी करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, शर्टावर तीन कार्ड्स ठेवण्यात आले आहेत. त्या ठिकाणाहून शर्ट्स सोप्या पद्धतीने फोल्ड केला आणि व्यवस्थित ठेवून दिला. अतिशय सोपी पद्धत वापरून ती शर्टाची क्षणात घडी घालते.

- Advertisement -

आनंद महिंद्रा यांना हा व्हिडीओ खूप आवडला. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, मी अशा छोट्या गोष्टींपासून खूप लवकर इंम्प्रेस होतो. मी जग बदलू शकत नाही. पण महिलेनी केलेली ही गोष्ट अत्यंत रचनात्मक आणि जबरदस्त डोकॅलिटीचा भाग आहे. यामुळे वेळ वाचतो, असं आनंद महिंद्रा कॅप्शनमध्ये म्हणतात.

- Advertisement -

आनंद महिंद्रा यांनी ही पोस्ट ५ एप्रिलला ट्विटरवर शेअर केली होती. यानंतर या व्हिडिओला आतापर्यंत १ दशलक्षांपेक्षा अधिक वेळा यूजर्सनी पाहिले आहे. त्यावर कमेंट्सही केल्या आहेत.


हेही वाचा : सारस-आरिफचं प्रेम निखळ, अखिलेशनंतर खासदार वरुण गांधींचं समर्थन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -