घरताज्या घडामोडीआनंद महिंद्रा म्हणतात...अमिताभजी तुमच्या शरीरातच आहे लस, ज्याचे कोड नेम...

आनंद महिंद्रा म्हणतात…अमिताभजी तुमच्या शरीरातच आहे लस, ज्याचे कोड नेम…

Subscribe

उद्योजक आनंद महिंद्रा यांनी अमिताभ बच्चन यांच्या शरीरातच लस असल्याचे म्हटले असून त्याचे कोड नेम देखील सांगितले आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असून सध्या त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. या बातमीने चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर सर्व चाहत्यांनी तुम्ही लवकर बरे व्हा, अशी प्रार्थना देखील केली. दरम्यान, आता उद्योजक आनंद महिंद्रा यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले आनंद महिंद्रा?

उद्योजक आनंद महिंद्रा यांनी अमिताभ बच्चन यांच्याविषयी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले आहे की, ‘आम्ही सर्वजण तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत. त्यामुळे तुम्ही काळजी करु नका. खरं तर तुमच्या शरीरातच लस आहे. ज्याचे कोड नेम ‘बिग बीं’ आहे. जी तुमच्या शरीरात पहिल्या पासूनच आहे. त्यामुळे तुम्ही सहजरीत्या या कोरोनावर मात करु शकता’. हे ट्विट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

- Advertisement -


बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यानंतर जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक-ऐश्वर्या यांची आठ वर्षांची मुलगी आराध्या बच्चन यांची कोरोना चाचणी केली असता ऐश्वर्या आणि आराध्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.


हेही वाचा – Video : आनंद महिंद्रा यांनी केले मुंबईच्या ‘या’ आगळ्यावेगळ्या रिक्षाचे कौतुक


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -