घरदेश-विदेशआनंदीबेन पटेल यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य

आनंदीबेन पटेल यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य

Subscribe

मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. स्तनपानाचे महत्तव सांगत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

मध्यप्रदेशच्या राज्यपाल आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी पुन्हा एकदा बेताल वक्तव्य केल्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. ‘स्तनपान केल्यामुळे फिगर बिघडते असे शहरातील महिलांना वाटते’ असे महिलांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य आनंदीबेन पटेल यांनी केले आहे. काशीपुरी येथे अंगनवाडी केंद्राने बुधवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमा दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

- Advertisement -

शहरातील महिला फिगरसाठी बाळाला दुध पाजत नाही

स्तनपानाचे महत्त्व सांगत असताना आनंदीबेन यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महिलांनी मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी चांगल्या प्रतिचा आहार घेतला पाहिजे. “फिगर बिघडेल म्हणून शहरातील महिला बाळांना दुध पाजत नाही. बाळ जन्माला आल्यानंतर त्यांना बॉटलने दुध पाजले जाते. ज्या दिवशी बॉटल फुटेल त्या दिवशी या बाळांचे भविष्य फुटेल” असं आनंदीबेन यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान उज्ज्व योजनांचा लाभ घ्या

गर्भवती महिला आणि बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी चांगला आणि पौष्टिक आहार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अंगनवाडी केंद्रामध्ये नाव नोंदणी करा, असा सल्ला आनंदीबेन पटेल यांनी गर्भवती महिलांना दिला आहे. त्याचप्रमाणे महिलांनी केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वल योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन आनंदीबेन पटेल यांनी केले.

- Advertisement -

गृहलक्ष्मी मॅगझिनच्या कव्हर पेजला विरोध

या आधी गृहलक्ष्मी मॅगझिनच्या कव्हर पेजवरील स्तनापानाच्या फोटोवरुनही वाद निर्माण झाला होता. यामध्येच आता आनंदीबेन पटेल यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गृहलक्ष्मी मॅगझिनने मार्च २०१८ मध्ये मल्याळम एडिशनच्या कव्हरपेजची कव्हर स्टोरी स्तनपनावर केली होती. या मॅगझिनच्या कव्हर पेजवर मलयालमची प्रसिध्द अभिनेत्री गिलू जोसफ बाळाला स्तनपान करताना दाखवले गेले होते. या कव्हर पेजवरील फोटोमधून एक चांगला संदेश देण्यात आला होता. “आई केरळला सांगना की, वाईट नजरेने बघू नका, स्तनपान करणे खूप गरजेचे आहे” असा संदेश देण्यात आला होता. प्रसिध्दीच्या एका आठवड्यातच या मॅगझिनच्या कव्हर पेजवरुन सोशल मीडियावर वादग्रस्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. या मॅगझिनविरोधात केरळ हाय कोर्टात अनेकांनी धाव घेतली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -