घर देश-विदेश राम मंदिर बांधकामाच्या खोदकामात सापडले प्राचीन शिलालेख; मूर्ती, स्तंभाचाही समावेश

राम मंदिर बांधकामाच्या खोदकामात सापडले प्राचीन शिलालेख; मूर्ती, स्तंभाचाही समावेश

Subscribe

सध्या राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. या मंदिराच्या बांधकामाबाबत अनेकदा राममंदिराचे फोटो हिंदूबांधवांसाठी सोशल मीडियावर शेअर केले जात आहे.

अयोध्या : हिंदूचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील मंदिर उभारणीचे काम सुरू आहे. या बाधकांच्या खोदकामात काही प्राचीन शिलालेख, मूर्ती आणि स्तंभ सापडले आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी एक फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.(Ancient inscriptions found in excavations of Ram temple construction Including statues, pillars)

सध्या राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. या मंदिराच्या बांधकामाबाबत अनेकदा राममंदिराचे फोटो हिंदूबांधवांसाठी सोशल मीडियावर शेअर केले जात आहे. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू आहे. या उत्खननात एका प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले. त्यात अनेक पुतळे आणि स्तंभाचा समावेश आहे.

दगडांवर देवीदेवतांची शिल्पे कोरलेली

- Advertisement -

मंदिराच्या बांधकामादरम्यान उत्खननात सापडलेल्या वस्तूंची छायाचित्रे उघड होण्याची ही पहिलीच वेळ आहे, ज्यामध्ये डझनभराहून अधिक मूर्ती, स्तंभ, दगड इत्यादींचा समावेश आहे. या खडकांवर देवदेवतांची शिल्पे कोरलेली आहेत. फोटोमध्ये मंदिरांमध्ये बसवलेले स्तंभही दिसत आहेत. उत्खननादरम्यान सापडलेले हे अवशेष रामलल्लाच्या भव्य मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : शासन आपल्या दारी अन् उपोषण सोडवणं एवढंच काम सरकारकडे; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा टोला

हिंदू धर्मियांची बाजू आखणी मजबूत

- Advertisement -

मंदिराचे बांधकाम सुरू झाले तेव्हा सुमारे 40 ते 50 फूट खोदकाम करण्यात आल्याची माहिती आहे. या सर्व वस्तू मंदिर संकुलाच्या उत्खननादरम्यान सापडल्या, ज्यामुळे हिंदू बाजूचा दावा आणखी मजबूत झाला. एएसआयच्या सर्वेक्षणातही अनेक वस्तू सापडल्या. मंदिर-मशीद प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांचीही दखल घेतली होती.

हेही वाचा : लिबियामध्ये महापुरामुळे हाहाकार; पाच हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

2024 पर्यंत होणार मंदिरांचे बांधकाम पूर्ण

राम मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. पहिला मजला जवळजवळ तयार आहे. जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे. पुतळ्यांचा अभिषेक झाल्यानंतरही बांधकाम सुरूच राहणार आहे. राम मंदिर ट्रस्टशी संबंधित लोकांच्या मते, पहिल्या मजल्यावरील आणि दुसऱ्या मजल्यावरील काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल. जानेवारीपर्यंत मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असून त्यानंतर भाविकांना दर्शन घेता येणार आहे. या वर्षाच्या अखेरीस लोकांना मंदिराच्या आत रामलला दिसू लागतील.

मंदिर परिसराची सुरक्षा वाढवली आहे

या सगळ्या दरम्यान रामजन्मभूमीच्या सुरक्षेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता त्याच्या सुरक्षेची कमान यूपी सरकारने अलीकडेच स्थापन केलेल्या एसएसएफच्या हातात असेल. विशेष सुरक्षेसाठी प्रशिक्षण देण्यात आलेल्या यूपी पोलिस आणि पीएसीच्या सर्वोत्तम कर्मचाऱ्यांची निवड करून हे दल तयार करण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी एसएसएफ बटालियन अयोध्येत पोहोचली आहे.

- Advertisment -