Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश ...आणि 'तो' चंद्रावर चालत असताना त्याच्या मागून चक्क ऑटो आली; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

…आणि ‘तो’ चंद्रावर चालत असताना त्याच्या मागून चक्क ऑटो आली; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Subscribe

चांद्रयान-3 च्या यशस्वीतेनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे जगभर कौतूक केले जात आहे. कारण, चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर पाऊल ठरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.

बंगळुरू : अंतराळात जाताना घालावा लागतो तसाच स्पेस सूट त्याने घातला. आणि चंद्रावर मून वॉक करतात अगदी तसाच वॉक करत होता. हे सगळं सुरू असताना मात्र, त्याच्या मागून चक्क ऑटो येऊन गेला. हा हसवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र, व्हिडीओमधील चित्र चंद्रावरील नसून ते आपल्याच पृथ्वीवरील आहे. (…and ‘he’ was walking on the moon when an auto followed him; Video viral on social media)

- Advertisement -

चांद्रयान-3 च्या यशस्वीतेनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे जगभर कौतूक केले जात आहे. कारण, चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर पाऊल ठरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. या यशाचे सर्वचजण आनंद व्यक्त करीत आहेत. तर आता इस्रोने सूर्यावर जाण्याची मोहीम आखली असून, 2 सप्टेंबर रोजी आदित्य एल-1 नावाचे यान सूर्याकडे झेपावणार आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये एक व्यक्ती मूक वॉक करत आहेत. दरम्यान त्याच्या मागून एक ऑटो येते. यामुळे सर्वत्र हश्याचे फव्वारे उडत आहेत. मात्र, हा व्हिडीओ चंद्रावरील नाही तर पृथ्वीवरील आहे.

हेही वाचा : मुझफ्फरनगर शाळेतील मारहाण प्रकरणी फॅक्ट चेकर मोहम्मद झुबेरवर गुन्हा दाखल; जाणून घ्या कारण

तो मून वॉक बंगळुरूच्या रस्त्यावरील

- Advertisement -

वास्तविक, हा व्हिडिओ एका भारतीय अभिनेत्याचा आहे. जो स्पेससूट घालून बंगळुरूच्या रस्त्यावर फिरत आहे. या अभिनेत्याचे नाव पूर्णचंद्र म्हैसूर असल्याचे सांगितले जात आहे. पूर्णचंद्र म्हैसूर हे बंगळुरूच्या रस्त्यांवरील खड्डय़ांवरून जणू चंद्रावर चालत आहेत. चार वर्षे जुना हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ वेगवेगळ्या चॅनलवरून शेअर केला जात आहे, ज्यावर लोक जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा : शाळेला दांडी मारल्याची शिक्षा टाळण्यासाठी 3 मुलींनी रचली अशी कहाणी की उडाली खळबळ; नेमकं घडलं काय?

व्हिडीओवर आल्या मजेशीर कमेंट

व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, प्रशासन त्यांच्यापेक्षा जास्त क्रिएटिव्ह आहे, जे पृथ्वीवर चंद्रासारखा रस्ता बनवत आहे. तर दुसर्‍याने लिहिले आहे, मला ऑटो दिसला नाही तर तो पृथ्वीचा आहे की चंद्राचा आहे, हे मला समजत नाही. दुसरा लिहितो, मला वाटले ऑटोचालक आधी पोहोचला. अशा अनेक मजेशीर प्रतिक्रिया या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत.

- Advertisment -