… आणि ग्रहणानंतर सूर्य हसला, नासाच्या ‘त्या’ फोटोची चर्चा

पहिल्यांदाच नासाच्या उपग्रहाने सूर्याचे हसतानाचे छायाचित्र कॅमेरात कैद केले आहे.

सूर्याला आगीचा गोळा म्हटले जाते. कोणीही सूर्याजवळ जाऊ शकत नाही. सूर्य हा तप्त असतो त्यामुळे सूर्याजवळजो कोणी जाईल त्यःची क्षणार्धात भासम होईल असे म्हटले जाते. पण पृथ्वीवर जीवसृष्टी असण्याचे सर्वात मोठे कारण सूर्य आहे, आपण दररोज सकाळी आणि संध्याकाळी सूर्याकडे पाहतो. तेव्हा त्याची वेगवेगळी रूपे आपल्याला पाहायला मिळतात. पण तुम्ही सूर्याला कधी हसताना पाहिलं आहे का? पण असे घडले आहे. पहिल्यांदाच नासाच्या उपग्रहाने सूर्याचे हसतानाचे छायाचित्र कॅमेरात कैद केले आहे.

गुरुवारी सकाळी नासाच्या उपग्रहावरून हे छायाचित्र घेण्यात आले. फोटो शेअर करताना नासाने कॅप्शन दिले आहे की, ‘आज नासाच्या सोलर डायनॅमिक्स ऑब्झर्व्हेटरीने सूर्याला हसताना कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. अल्ट्राव्हायोलेट प्रकाशात दिसणारे, सूर्यावरील हे गडद ठिपके कोरोनल होल म्हणून ओळखले जातात आणि तिथे तीव्र सौर वारे अवकाशातून वाहतात.

या फोटोच वैशिष्ट्य काय?
या छायाचित्राकडे बारकाईने पाहिल्यास तो आपल्याच कडे पाहून हसत असल्याचे दिसते. नासाच्या सोलर डायनॅमिक्स ऑब्झर्व्हेटरीमधून काढलेले हे छायाचित्र पाहता असे दिसते की त्याचे दोन गडद डोळे, एक गोल नाक आणि हसरी मुद्रा आहे.

सूर्यावर नासाची नजर
2010 मध्ये नासाने सोलर डायनॅमिक्स ऑब्झर्व्हेटरी (SDO) लाँच केली होती. तेव्हापासून ते अंतराळात फिरत आहे आणि सूर्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहे. याचा उपयोग अवकाशातील हवामानाचा अभ्यास करण्यासाठी आणि ताऱ्यांच्या स्थिती आणि होणारे स्फोट यांचा मागोवा घेण्यासाठी केला जातो.


हे ही वाचा –  देशभरात पोलिसांसाठी लागू होणार ‘एक राष्ट्र, एक गणवेश’? पंतप्रधान मोदींचे राज्यांना आवाहन