घरदेश-विदेशअदानी समुहाची पुन्हा मुसंडी; गॅस कंपनीच्या नफ्यात २१ टक्क्यांनी वाढ

अदानी समुहाची पुन्हा मुसंडी; गॅस कंपनीच्या नफ्यात २१ टक्क्यांनी वाढ

Subscribe

 

नवी दिल्लीः अदानी समुहाच्या टोटल गॅस कंपनीने गेल्या तीन महिन्यात ९७.९१ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत नफ्यात २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचा तिमाहीचा अहवाल सादर झाला. या अहवालातून नफ्याची आकडेवारी समोर आली आहे.

- Advertisement -

हिंडनबर्गने केलेल्या आरोपामुळे अदानी समुहाचे शेअर्स कोसळले होते. या आरोपाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने समितीही नेमली आहे. अशा परिस्थितीत अदानी समुहाच्या टोटल गॅस कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा अदानी समुहावरचा विश्वास कमी झालेला नाही हे या नफ्यातून स्पष्ट झाले असल्याची चर्चा आहे.

अदानी समुहाच्या टोटल गॅस कंपनीने सीएनजी स्टेशनचा विस्तार मोठ्या प्रमाणावर केला. परिणामी सीएनजीची मागणी २८ टक्क्यांनी वाढली. त्याचा फायदा कंपनीला झाला. कंपनीचा महसूल १,११४.८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. वर्षभरापूर्वी कंपनीचा महसूल १,०१२ कोटी रुपये होता.

- Advertisement -

गेल्या वर्षी अदानी समुहाच्या भांडवलात मोठी वाढ झाली. अदानी समूहात २०० अब्ज डॉलर्सची वाढ झाली. त्यामुळे मार्केट कॅपिटलायझेशन होणारा अदानी समूह भारतातील तिसरा उद्योग समूह बनला होता. अदानी पॉवरमध्ये १५७ टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये ५० टक्के, अदानी ग्रीन एनर्जीमध्ये ६७ टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये ५१ टक्के, अदानी पोर्ट्स अँड सेजमध्ये १७ टक्के आणि अदानी एंटरप्रायझेसमध्ये २८ टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.

गेल्या वर्षी फोर्ब्सने २०२२ वर्षातील जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जारी केली होती. रिलायन्स उद्योगसमूहाचे उद्योगपती मुकेश अंबानी ६.८७ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह सर्वात श्रीमंत भारतीय ठरले होते. जगातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी दहाव्या क्रमांकावर होते. तर गौतम अदानी ११ व्या क्रमांकावर होते.

अदानी समुहाची घोडदौड सुरु असतानाच हिंडनबर्गने अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात कंपनीने अफरातफरीचा दावा करण्यात आला. त्यामुळे अदानी समुहाचे शेअर्स कोसळले. यावरुन राजकीय घमासान सुरु झाले. लोकसभेच्या अधिवेशनातही गदारोळ झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -