घरदेश-विदेशधक्कादायक! १८ महिन्यांच्या चिमुकल्याला मातेनेच केली अमानुष मारहाण; व्हिडिओ व्हायरल, महिलेला अटक

धक्कादायक! १८ महिन्यांच्या चिमुकल्याला मातेनेच केली अमानुष मारहाण; व्हिडिओ व्हायरल, महिलेला अटक

Subscribe

प्रत्येक आईसाठी आपलं मुल हे देवाच्या फुलासमान असतं. मात्र आंध्र प्रदेशातून असा एक प्रकार समोर आलाय की जो जाणून घेतल्यानंतर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. आंध्र प्रदेशातील राहणाऱ्या एका निर्दयी आईने आपल्या पोटच्या १८ महिन्यांच्या चिमुकल्याला आमानुष मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक आई तिच्या १८ महिन्यांच्या मुलाला निर्घृणपणे मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आंध्र प्रदेश पोलिसांनी या आईला अटक केली आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही की आई आपल्या पोटच्या गोळ्याला कशी मारू शकते.

या व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की संतप्त आई मुलाला बेदम मारहाण करत आहे. ती महिला रागाच्या भरात मुलाच्या तोंडावर बुक्के मारताना दिसत आहे. बुक्का मारल्यानंतर, मुलाच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येऊ लागते.  यानंतर देखील ती त्याला जवळ न घेता मारत असल्याचे दिसतेय. या व्हिडिओमध्ये लहान मुलाच्या पाठीवर लाल डाग उठल्याचे देखील दिसत आहेत. यावरून असे दिसून येते की, आईने आपल्या मुलाला किती बेदम मारहाण केली असावी.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेने तिचे नाव तुळशी असे सांगितले आहे, जिचे वय अंदाजे २२ वर्षे आहे. तिने असे सांगितले की, तिचा चार वर्षांपूर्वी विवाह वदिवजाघन नावाच्या व्यक्तीशी झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी महिलेला अटक केल्याचे देखील सांगितले जात आहे. ज्यावेळी तुलसीने तिच्या मुलाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होऊन तिच्या नातेवाईकांना मिळाला तेव्हा त्यांनी तिच्या पतीला याची माहिती दिली. व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसते की, महिलेने मुलाचे दोन्ही हात वरच्या दिशेले बांधले आणि नंतर मारहाण करण्यास सुरुवात केली.


लवकर बरे व्हा, बाकी आम्ही बघतो – राज ठाकर

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -