घरदेश-विदेशभाजप खासदाराच्या गाडीने २ महिलांना उडवले; एक जागीच ठार

भाजप खासदाराच्या गाडीने २ महिलांना उडवले; एक जागीच ठार

Subscribe

भाजपच्या जी. व्ही. एल. नरसिंह राव या खासदाराने महिलांना उडवून घटना स्थळावरुन पळ काढला आहे. या अपघातात एक महिला ठार झाली असून दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी नरसिंह रावच्या कार चालकाला अटक करण्यात आली आहे.

भरधाव वेगात गाडी घेऊन येणाऱ्या भाजपच्या एका खासदाराने दोन महिलांना उडवून घटना स्थळावरुन पळ काढल्याची घटना विजयवाडामध्ये घडली आहे. या अपघातात एक महिला ठार झाली असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी हा अपघात घडला असून जी. व्ही. एल. नरसिंह राव या खासदाराची ही गाडी असल्याचे उघड झाले आहे. रस्ता ओलांडत असताना या दोन महिलांना गाडीची धडक देत पोबारा करणाऱ्या या खासदारावर सोशल मीडियातून टीका केली जात आहे.

नेमके काय घडले?

भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार आणि प्रवक्ते जी. व्ही. एल. नरसिंह राव त्यांच्या कारने प्रकाशम जिल्ह्यातून विजयवाडा येथे जात होते. राव यांची गाडी राष्ट्रीय महामार्गावर पोहोचली. त्याचदरम्यान त्या रस्त्यावरुन दोन महिला रस्ता ओलांडत होत्या. रस्ता ओलांडत असताना राव यांची गाडी महिलांना धडकून दुभाजकावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे.

- Advertisement -

अपघात झाल्याचे कळताच त्या महिलांचे कुटुंब आणि ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. जमावाचा संताप पाहता राव यांनी घटनास्थळावरुन दुसऱ्या कारमधून पळ काढला. याप्रकरणी राव यांच्या कारचालकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियातून खासदारावर टीका

या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपा खासदार आणि प्रवक्ते जी. व्ही. एल. नरसिंह राव यांच्यावर टीका केली जात आहे. एवढा मोठा अपघात घडला असताना देखील खासदारांनी जखमींना मदत न करता तेथून काढता पाय घेतला. हा अत्यंत दुर्दैवी प्रकार असल्याचे सोशल मीडियातून म्हटले जात आहे.

‘पाऊण तास मी तिथेच होतो’हा प्रकार घडला त्यावेळी माझा ड्रायव्हर गाडी चालवत होता. मी मागच्या सीटवर झोपलो होतो. अपघात झाल्य़ाचे कळताच मी पोलीस येईपर्यंतआणि जखमींना रुग्णालयात घेऊन जाईपर्यंत घटनास्थळी थांबलो होतो. मी पाऊण तास घटनास्थळी थांबलो होतो. तसेच मी दोन्ही कुटुंबांची भेट देखील घेणार आहे.  – जी. व्ही. एल. नरसिंह राव, भाजपा खासदार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -