Andhra Pradesh Rains: विजयवाडा विभागात मुसळधार पावसामुळे गाड्यांचे मार्ग वळवले

Andhra Pradesh Rains: Heavy rains diverted train in Vijayawada division
Andhra Pradesh Rains: विजयवाडा विभागात मुसळधार पावसामुळे गाड्यांचे मार्ग वळवले

आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार घातला आहे. मुसळधार पावसामुळे काही भागातील रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. ज्यामुळे स्थानिक लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या विजयवाडा विभागातील पड़गपाड आणि नेल्लोर दरम्यान किमी १७७ येथे पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने, पुढील गाड्या वळवण्यात आल्या आहेत.

१२६४२ निजामुद्दीन-कन्याकुमारी एक्सप्रेस २० नोव्हेंबरला  प्रस्थान झालेली ट्रेन वर्धा -भुसावळ – इगतपुरी – पनवेल- रोहा- मडगाव – षोरणूर मार्गे वळवली आहे.

१२६१६ नवी दिल्ली-एमजीआर चेन्नई सेंट्रल जीटी एक्सप्रेस २० नोव्हेंबरला  प्रस्थान झालेली ट्रेन वर्धा -भुसावळ -मनमाड -दौंड कॉर्ड लाइन -पुणे -मिरज -हुब्बळी – यशवंतपूर -जोलारपेट्टे -एमजीआर चेन्नई सेंट्रल मार्गे वळवली आहे.

 


हे ही वाचा – Rajasthan Cabinet Reshuffle: राजस्थानच्या नव्या मंत्रिमंडळाचा झाला विस्तार, ११ मंत्री आणि ४ राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ