घरताज्या घडामोडीआंध्र प्रदेशात तेलाचे टँकर साफ करताना सात मजुरांचा मृत्यू

आंध्र प्रदेशात तेलाचे टँकर साफ करताना सात मजुरांचा मृत्यू

Subscribe

आंध्र प्रदेशात तेलाचे टँकर साफ करताना सात मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्हात ही घटना घडली. मजुरांच्या मृत्यूनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आंध्र प्रदेशात तेलाचे टँकर साफ करताना सात मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्हात ही घटना घडली. मजुरांच्या मृत्यूनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच, या मजुरांच्या मृत्यूची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत अधिक तपासाला सुरूवात केली आहे. (andhra pradesh several workers hospitalised after inhaling gas while cleaning tankers in ragampeta village)

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यात तेल कारखान्याचे टँकर साफ करताना सात कामगारांचा मृत्यू झाला आहे. गुदमरल्याने मजुरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रागमपेठ गावाजवळ खाद्यतेलाचा कारखाना आहे. ही घटना गुरुवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.

- Advertisement -

प्राथमिक माहितीनुसार मृत हे पेद्दापुरम मंडलातील पडेरू आणि पुलीमेरू येथील रहिवासी आहेत. याप्रकरणी एका प्रत्यक्षदर्शीने या घटनेची माहिती दिली आहे. त्यानुसार, सुरूवातीला एक मजूर टाकीत शिरला. पण बराच वेळा झाल्याने संबंधीत मजूर बाहेर न आल्याने त्याला पाहण्यासाठी बाकीचे मजूर टँकरमध्ये शिरल्याचे त्यांनी सांगितले.

मजुरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. नातेवाइकांनी कारखाना व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. कारखान्याकडून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस व्यवस्था करण्यात आली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – देशात सत्यमेव जयतेला महत्त्व, सत्तामेव जयतेला नाही; आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -