घरक्राइमधक्कादायक! घरातील ड्रममध्ये सापडले महिलेच्या शरीराचे तुकडे; पोलिसांकडून तपास सुरू

धक्कादायक! घरातील ड्रममध्ये सापडले महिलेच्या शरीराचे तुकडे; पोलिसांकडून तपास सुरू

Subscribe

गेल्या महिन्यात आफताब अमीन पूनावाला या आरोपीने त्याची लिव्ह-इन गर्लफ्रेंड श्रद्धा वालकरची दिल्ली हत्या करत तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताबला अटक केली असून याप्रकरणी अद्याप कसून चौकशी सुरु आहे. या घटनेची दखल संपूर्ण देशाने घेतली, मात्र यानंतरही अशाप्रकारच्या एकामागून एक घटना उघड होऊ लागल्या. यात आता आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमध्ये एका बंद घरातील ड्रममध्ये महिलेच्या शरीराचे तुकडे आढळले आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वर्षभराहून अधिक काळ या मृतदेहाचे तुकडे या घरातील ड्रममध्ये पडून असल्याचा पोलिसांना संशय आहे. या घरात राहणाऱ्या भाडेकरूने वर्षभर एकदाही भाडे न दिल्याने त्याचा मालक भाडं घेण्यासाठी आला होता, यावेळी दरवाजा बंद असल्याने मालकाने दरवाजा तोडला त्यावेळी घरातील ड्रममध्ये महिलेच्या शरीराचे अवयव आढळून आले.

- Advertisement -

जून 2021 मध्ये भाडेकरून त्याची पत्नी गरोदर असल्याचे कारण देत घरभाडे न देताच घर खाली केले. परंतु तो मागच्या दाराने एकदा घरी आला होता असेल काहींचे म्हणने आहे. पण अद्याप या भाडेकरूने घरमालकाला भाडे दिले नाही. एक वर्षांहून अधिक काळ वाट पाहिल्यानंतर घर मालकाने जबरदस्तीने भाडेकरूचे सामान बाहेर काढण्यासाठी घराचा दरवाजा तोडला. यावेळी घरातील ड्रममध्ये महिलेच्या शरीराचे तुकडे सापडले आहेत.

पोलिसांना प्राथमिक पुराव्यावरून असे दिसून आले की, एक वर्षापूर्वी या महिलेच्या शरीराचे तुकडे करण्यात आले होते, जे आता घर खोलल्यानंतर दिसून आले आहेत. पोलिसांना संशय आहे की, मृत महिला ही त्या भाडेकरूची पत्नी असावी. याप्रकरणी आता घरमालकाने तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.


तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी मुंबई अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -