घरCORONA UPDATEएका फोटोग्राफरमुळे गावातील लोकांना झाली कोरोनाची लागण...

एका फोटोग्राफरमुळे गावातील लोकांना झाली कोरोनाची लागण…

Subscribe

या एकट्या गावात केवळ एका फोटो ग्राफरमुळे कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत.

देशात दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आता नागरिकांनीच योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. खबरदारीचा उपाय म्हणू देशात लॉकडाऊनही सुरू आहे. लॉकडाऊनचा ५ टप्पा जरी शिथील करण्यात आला असला तरी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचं आहे. कारण आता कम्युनिटी स्प्रेड होण्याचा धोका जास्त वाढला आहे. याचाच प्रत्यय सध्या आंध्र प्रदेशातील काकीनाडा गावातील रहीवासी घेत आहेत. आंध्र प्रदेशातील काकीनाडा शहरातील रहिवाशीयांना एका फोटोग्राफरमुळं कोरोनाची लागण झाली आहे.

काकीनाडापासून २० किमीवर असलेले गोल्लाला ममीददा हे गाव कोरोना हॉटस्पॉट म्हणून ओळखले जात आहे. या एकट्या गावात केवळ एका फोटो ग्राफरमुळे कोरोनाचे तब्बल ११६ रुग्ण आहेत. या गावातील ५३ वर्षीय व्यक्तीचा २० मेला मृत्यू झाला, ही व्यक्ती फोटोग्राफर असून गावात विविध कार्यक्रमांना उपस्थित होती. या व्यक्तीमुळेच कोरोनाचा प्रसार झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

- Advertisement -

या गावात कार्यक्रमांना हजर

मृत फोटोग्राफर व्यक्ती पेडापुडी मंडल,  रामचंद्रपूरम, अनापर्ती, बिक्कावोलू आणि मंदेपेटा मंडल या गावात कार्यक्रमांसाठी गेली होती. त्यानंतर या गावात तब्बल १५०  कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. रामचंद्रपूरममध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात फोटो काढत असताना या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली,  असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही व्यक्ती मास्कशिवाय या कार्यक्रमाला उपस्थित होती. तसेच फोटोग्राफर व्यक्तीचा मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे. या मुलानेही याच दरम्यान काही मित्रांसोबत पार्टी केली होती. त्यामुळं या व्यक्तीमुळं कोरोना सुपर स्प्रेडर म्हणून ओळखला जात आहे.

सध्या आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचे एकूण ४,५१० रुग्ण आहेत. यातील २,६२०  रुग्ण निरोगी होऊन घरी परतले आहेत तर, ७३  जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – आता कोरोना पॉझिटिव्हवर घरीच होणार उपचार, ‘या’ असतील अटी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -