घरताज्या घडामोडीJNU हल्ल्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट!

JNU हल्ल्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट!

Subscribe

जेएनयूमध्ये रविवारी रात्री झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

रविवारी रात्री दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये झालेल्या राड्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. जेएनयूएसयू अर्थात जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनच्या विद्यार्थी आणि काही प्राध्यापकांवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरातल्या विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलनाची आणि निषेधाची भूमिका घेतली आहे. मुंबई, दिल्ली, पुणे इथल्या कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांनी रात्रीपासूनच आंदोलन सुरू केलं आहे. जेएनयूमधल्या घटनेचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातल्या प्रकारानंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच देशाच्या दुसऱ्या नामांकित विद्यापीठामध्ये असा प्रकार घडल्यामुळे देशभर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी ट्वीटरवर #JNUattack #LeftAttacksJNU #ShutDownJNU असे ट्रेंड सुरू झाले आहेत. देशातील अनेक मान्यवरांनी, नेतेमंडळींनी आणि सेलेब्रिटींनी या हल्ल्याची निंदा केली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीटरवर प्रतिक्रिया न दिल्यामुळे नेटिझन्सने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


हेही वाचा – जेएनयूच्या विद्यांर्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा मुंबई,पुण्यात तीव्र निषेध
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -