घरदेश-विदेशराजीनामा दिल्यानंतर अनिल अँटोनी म्हणाले, "मला रात्रीपासून..." वाचा सविस्तर

राजीनामा दिल्यानंतर अनिल अँटोनी म्हणाले, “मला रात्रीपासून…” वाचा सविस्तर

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीला विरोध करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटनी यांचा मुलगा अनिल के. अँटनी यांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

Anil Antony Resign BBC Documentary Controversy : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीला विरोध करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटोनी यांचा मुलगा ए. के. अँटनी यांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर अनिल अँटोनी यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. “मी आयुष्यभर काँग्रेसशी निगडीत आहे आणि माझे वडील गेली ६ दशके पक्षासोबत आहेत. अशा पार्श्‍वभूमीवर गेल्या २४ तासांत विशेषत: काँग्रेसच्या काही कानाकोपऱ्यात जे काही घडले, त्यामुळे मला खूप त्रास झाला. माझ्या मते हा योग्य निर्णय आहे,” असं अनिल अँटोनी म्हणाले.

बीबीसीने पीएम मोदी आणि २००२ च्या गुजरात दंगलीवर एक डॉक्युमेंट्री बनवली आहे, याला त्यांनी विरोध केला होता. त्यांनी दिलेली प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच या प्रतिक्रियेसंदर्भातलं ट्विट डिलीट करण्याचा दबावही त्यांच्यावर टाकण्यात येत होता. त्यामुळे अनिल अँटोनी यांनी राजीनामा दिला आहे. यासंदर्भातील त्यांचं ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय.

- Advertisement -

अनिल अँटोनी म्हणाले होते की, भारतीय संस्थांवर ब्रिटिश ब्रॉडकास्टरच्या कल्पनेला महत्त्व दिल्याने देशाच्या सार्वभौमत्वावर परिणाम होईल. अनिल अँटोनी हे काँग्रेसच्या केरळ युनिटचे डिजिटल कम्युनिकेशन हाताळत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी कालच ट्विट केलं होतं आणि ते ट्विट मी माझ्या चांगल्या हेतूने केलं होतं…, त्यानंतर अनेक धमकीचे कॉल्स आणि द्वेष करणारे मेसेज येऊ लागले. मी कुठून आलो आहे, मला वाटत नाही की हे लोक तेच आहेत ज्यांच्यासोबत मी काम केलं पाहिजे.”

- Advertisement -

काय म्हणाले होते अनिल अँटोनी ?

अनिल अँटोनी यांनी ट्विटरवर सरकारचे समर्थन करताना म्हटले होते की, “भाजपसोबत सर्व मतभेद असूनही, बीबीसी आणि यूकेचे माजी परराष्ट्र सचिव जॅक स्ट्रॉ यांच्या मतांपेक्षा त्यांच्या मतांना अधिक महत्त्व देणे हे धोकादायक आहे. भारतीय संस्था आणि यामुळे देशाच्या सार्वभौमत्वावर परिणाम होत आहे. अनिल अँटोनी यांनी ट्विटमध्ये असेही म्हटले आहे की, “बीबीसी हे सरकार प्रायोजित चॅनल आहे आणि भारताप्रति कथित पक्षपाताचा इतिहास आहे. जॅक स्ट्रॉने ‘इराक युद्धाची योजना’ बनवली होती. २००३ मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालील युतीने इराकवर आक्रमण केले.


हेही वाचाः Google Search ला मायक्रोसॉफ्टच्या Chat GPTची कडवी टक्कर, जाणून घ्या वैशिष्ट्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -