घरदेश-विदेशAnju Nasrullah : भारतात परतली अंजू, प्रियकर नसरुल्लाही येणार; दोघांच्या भविष्याची योजना...

Anju Nasrullah : भारतात परतली अंजू, प्रियकर नसरुल्लाही येणार; दोघांच्या भविष्याची योजना वाचा…

Subscribe

नवी दिल्ली : अलिकडे अंजू तर कधी सीमा-सचिन ही दोन नावं सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये खूप चर्चेत होती. मात्र त्यानंतर काही काळ ही दोन्ही नावे इंटरनेट विश्वातून गायब झाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. कारण प्रेमासाठी पाकिस्तानात गेलेली अंजू बुधवारी (29 नोव्हेंबर) रात्री उशिरा भारतात परतली आहे. यानंतर तिचा प्रियकर नसरुल्लाही भारतात येणार असल्याचे समजते. त्याने भारतातील एका वृत्तवाहिनीशी चर्चा करताना मोठे खुलासे केले आहेत. तसेच भविष्यातील त्या दोघांच्या योजना सांगितल्या आहेत. (Anju Nasrullah Anju returned to India lover Nasrullah will also come Read their future plans)

हेही वाचा –  NIT Srinagar Student: महाराष्ट्राचा विद्यार्थी NIT श्रीनगरमधून निलंबित, FIR दाखल; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप 

- Advertisement -

प्रियकर नसरुल्लाहसाठी अंजू पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथे गेली होती. अंजूने ख्रिश्चन धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला आहे आणि तिने नसरुल्लाशी लग्न केले. तिने अंजू हे नाव बदलून फातिमा केले आहे. अंजू परतल्यानंतर आता नसरुल्लाही भारतात येण्याच्या तयारीत आहे. नसरुल्लाने सांगितले की, अंजू तिच्या मुलांना मिस करत आहे. याच कारणामुळे तिला भारतात जाण्याची परवानगी दिली आहे. अंजूने परत कधी याबाबत विचारले असता, नसरुल्लाह म्हणाला की, ‘भारतात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती परत येईल. घटस्फोट आणि मुलांचा ताबा घेऊन अंजू पाकिस्तानात परतणार आहे. अंजू मुलांना परत आणेल असा विश्वासही नसरुल्लाहने रिपब्लिक इंडिया या वृत्तवाहिनीशी चर्चा करताना सांगितले आहे. 

- Advertisement -

नसरुल्लाह भारतात येण्याच्या तयारीत

अंजू गेल्या चार महिन्यांपासून पाकिस्तानात होती. त्यामुळे नसरुल्लाह विचारले की, तुम्ही दोघांनी इतके दिवस काय केले, यावर तो म्हणाला की, आम्ही चार महिने एकत्र राहिलो आणि यादरम्यान खूप प्रवास केला. आम्ही दोघं संपूर्ण पाकिस्तान फिरलो. भारतात येणार आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना नसरुल्लाह म्हणाला की, मी तयारी करत आहे. यावेळी त्याला अंजूच्या पाकिस्तानी नागरिकत्वाबाबत विचारले असता तो म्हणाला की, आम्ही त्याबाबत विचार करत आहोत, पण त्या प्रक्रियेला थोडा जास्त वेळ लागेल. 

हेही वाचा –  Khalistan Movement : निज्जर प्रकरणाच्या सखोल तपासात भारताने आमच्यासोबत काम करावे; Canadaचे आवाहन

अंजूच्या मुलांना नसरुल्लाह घेणार दत्तक

अंजू पाकिस्तानात परत आल्यावर तिच्या मुलांना दत्तक घेणार का? यावर नसरुल्लाह म्हणाला की, अंजूच्या मुलांना दत्तक घेण्यासाठी मी 200 टक्के तयार आहे. अंजू भारतात किती काळ राहणार, असे विचारले असता नसरुल्लाह म्हणाला की, हे न्यायालयावर अवलंबून आहे. जितक्या लवकर घटस्फोटाची केस संपेल, तितक्या लवकर ती येईल, असा विश्वास नसरुल्लाहने व्यक्त केला. 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -