घर देश-विदेश प्रेमासाठी पाकिस्तानात गेलेली अंजू परतणार भारतात; तर सीमाने साजरा केला मोदींचा बर्थ...

प्रेमासाठी पाकिस्तानात गेलेली अंजू परतणार भारतात; तर सीमाने साजरा केला मोदींचा बर्थ डे

Subscribe

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील भिवडी येथून पाकिस्तानात पोहोचलेली अंजू आता भारतात परतणार आहे. प्रेमासाठी सीमा ओलांडलेली अंजू आपल्या मुलांना भेटण्यासाठी भारतात येणार आहे

नवी दिल्ली : सीमा-सचिन आणि अंजू-नसरुल्लाह यांची प्रेम कहानी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. भारतीय सचिनसाठी पाकिस्तानातून आलेली सीमा परत जाण्यास तयार नाही तर दुसरीकडे मात्र, भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू मात्र भारतात परतणार आहे. त्यामागील कारणही पुढे आले असून, ती पुढील महिन्यांत भारतात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर इकडे सीमाने मात्र, एक खास पद्धतीने आज पंतप्रधान नरेंद्र यांचा वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या आहेत.(Anju who went to Pakistan for love will return to India Seema celebrated Modis birthday)

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील भिवडी येथून पाकिस्तानात पोहोचलेली अंजू आता भारतात परतणार आहे. प्रेमासाठी सीमा ओलांडलेली अंजू आपल्या मुलांना भेटण्यासाठी भारतात येणार आहे. तिच्या पाकिस्तानी पतीने रविवारी सांगितले की, अंजू पुढील महिन्यात भारतात परत येऊ शकते. ती अस्वस्थ आहे आणि तिला तिच्या दोन मुलांची खूप आठवण येते असेही त्यांने म्हटले आहे.

फेसबुकवर झाली होती दोघांची मैत्री

- Advertisement -

25 जुलै रोजी इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर अंजूने तिचा 29 वर्षीय मित्र नसरुल्लासोबत विवाह (निकाह) केला. त्यांचे घर खैबर पख्तूनख्वामधील अप्पर दीर ​​जिल्ह्यात आहे. 2019 मध्ये त्यांची फेसबुकवर मैत्री झाली होती. अंजूचे नाव आता बदलून फातिमा ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा : MMRDA : बेरोजगारांच्या व्यवसायाकरिता विशेष कर्ज धोरणासह मच्छिमारांना किसान क्रेडिट कार्ड- दरेकर

अंजूचे बिघडू शकते मानसिक स्वास्थ्य

- Advertisement -

अंजूचा पती नसरुल्लाहने सांगितले की, फातिमा (अंजू) पुढील महिन्यात भारतात परतत आहे. ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे आणि तिला तिच्या मुलांची खूप आठवण येते. तिच्याकडे परत जाण्याशिवाय पर्याय नाही. अंजूचे पहिले लग्न राजस्थानमधील रहिवासी अरविंदसोबत झाले होते. त्यांना 15 वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा आहे. फातिमाचे मानसिक आरोग्य बिघडू नये अशी माझी इच्छा आहे. ती आपल्या मुलांना भेटायला तिच्या देशात गेली तर बरे होईल. पाकिस्तानात कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करून ती परत जाणार असल्याचे त्यांने सांगितले.

हेही वाचा : सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी पुढे केला महिला आरक्षणाचा मुद्दा; विशेष अधिवेशन ठरणार वादळी

सीमाने साजरा केला मोदींचा वाढदिवस

भारतीय सचिनच्या प्रेमात पडलेली सीमा हैदर परत पाकिस्तानात जाण्यास तयार नसून ती भारतातच राहत आहे. यादरम्यान ती कधी पंतप्रधानांना राखी पाठवते तर कधी हरियाणी गाण्यावर डान्स करते. याचे व्हिडीओ व्हायरल होतात. यादरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सीमाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisment -