मोदी सरकारविरोधात अण्णा हजारेंचे गांधी जयंतीला पुन्हा उपोषण

मोदी सरकारने मागण्या मान्य न केल्याने अण्णा हजारे पुन्हा एकदा उपोषणला बसणार आहेत. ३ मार्च २०१८ रोजी केलेल्या उपोषणा दरम्यान त्यांनी मोदी सरकारला काही मागण्या केल्या होत्या. त्या मागणया पूर्ण करण्याचे मोदींनी आश्वासन दिले होते.

Anna Hazare
अण्णा हजारे

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे मोदी सरकारच्याविरोधात पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. २ ऑक्टोबरला अण्णा हजारे राळेगण सिद्धि येथे लोकपाल आणि लोकायुक्तच्या मुद्दावरुन मोदी सरकारच्याविरोधात उपोषणाला बसणार आहेत. अण्णांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, सर्वांनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी राळेगण सिध्दीला न येता त्याच्या संबंधित क्षेत्रातील सरकारी मुख्यालयामध्ये केंद्र सरकारच्याविरोधात आंदोलन करावे, असे अण्णा हजारेंनी सांगितले आहे.

सरकारने मागण्या मान्य न केल्याने पुन्हा उपोषण

या आंदोलनासंदर्भात अण्णा हजार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी पत्र देखील लिहिले आहे. ३ मार्च २०१८ रोजी केलेल्या उपोषणा दरम्यान त्यांनी मोदी सरकारला काही मागण्या केल्या होत्या. त्या मागणया पूर्ण करण्याचे मोदींनी आश्वासन दिले होते. उपोषण सोडतेवेळी अण्णांना आश्वासन दिले होती की, सहा महिन्याच्या आत त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होतील. मात्र पाच महिने उलटले तरी देखील सरकारने काहीच प्रयत्न केले नाही. त्यामुळे मी पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचे अण्णांनी या पत्रात म्हटले आहे.

रामलीला मैदानावर केले होते उपोषण 

याआधी दिल्लीच्या रामलीला मैदानात मोदी सरकारच्या विरोधात अण्णा हजारे उपोषणाला बसले होते. त्यावेळ त्यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करावी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चावर दीडपट मोबदला मिळावा. त्याचबरोबर वयोवृध्द शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी केली होती. तसंच अण्णांनी राज्यात लोकायुक्तांची नियुक्ती आणि निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याची मागणी देखील केली होती.