घरअर्थजगतUnion Budget 2023 : देशातील पारंपारिक हात कामगारांसाठी 'पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान' योजनेची घोषणा

Union Budget 2023 : देशातील पारंपारिक हात कामगारांसाठी ‘पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान’ योजनेची घोषणा

Subscribe

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात भारतीय हातकामगारांसाठी मोठी घोषणा केली आहे. देशातील हजारो वर्षांपासून हाताच्या कौशल्याने वस्तू बनवणाऱ्या कुशल हातकामगारांना ‘पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान’ योजनेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार मदतनिधी देत असते. ही घोषणा करताना निर्मला सीतारामण म्हणाल्या की, अनुकूल सरकारी धोरणाच्या आधारे कुशल कारागीर आपल्या उत्पादनांना मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवू शकतात. अनेक वर्षांपासून हाताच्या कौशल्यावर उत्पादन करणाऱ्या कामगारांसाठी पहिल्यांदा मोदी सरकारने पीएम विश्वकर्मा कौशल विकास योजनेअंतर्गत पॅकेजची घोषणा केली आहे.

Cambodian Art & Handicraft

- Advertisement -

निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, पीएम विश्वकर्मा कौशल विकास योजनेअंतर्गत पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांसाठी मदत निधीची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामुळे त्यांना एमएसएमई मूल्य श्रृंखलेसोबत जोडत आपल्या उत्पादनांची गुणवत्ता, प्रमाण आणि पुरवठा करण्यास सक्षम बनवतील. शिवाय या योजनेमध्ये हातकामगारांना फक्त आर्थिक मदतच नव्हे तर नवीन कल्पनादेखील उपलब्ध केल्या जातील. तसेच हातकामगारांना बँक प्रमोशनसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बँकेसोबत देखील जोडले जाईल. यामुळे देशातील पारंपरिक हातकामगारांच्या समूहाला फायदा होईल.

4 schemes for empowering Indian handicrafts and artisans

- Advertisement -

यावेळी विरोधी पक्षाला उद्देशून निर्मला सीतारामन म्हणाल्या की, आज जगभरातील लोक भारतीय गोष्टींचा स्वीकार करीत आहे. जरी मोदी सरकारविरोधात काही जण तक्रार करीत असले तरी त्यांनी देशाचा होत असलेला विकास पाहून आनंदी व्हायला हवं. हा सर्वात चांगला अर्थसंकल्पात आहे. हे अर्थसंकल्पात गरीबांचे तसेच मध्यम वर्गीयांचे समर्थक आहे.

गरिबांना वर्षभर मिळणार मोफत रेशन

देशातील लहान-मोठ्या उद्योगांसोबतच केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत सुरु केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी 1 वर्षांनी वाढवण्याची घोषणा आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. यामुळे आता देशातील गरीबांना पुढील वर्षभर रेशन दुकांनावर मोफत अन्नधान्य मिळणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पात या योजनेविषयी माहिती दिली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत केंद्र सरकार 2 लाख कोटी रुपयांचा भार उचलत आहे, अशी माहिती देखील निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.


हेही वाचा :

आता गरिबांना वर्षभर मिळणार मोफत रेशन, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत 1 वर्षाची वाढ

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -