घर देश-विदेश महिला आरक्षण विधेयकाची पंतप्रधानांकडून घोषणा; घटना दुरुस्तीनंतर होणार मार्ग मोकळा

महिला आरक्षण विधेयकाची पंतप्रधानांकडून घोषणा; घटना दुरुस्तीनंतर होणार मार्ग मोकळा

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सरकार महिला सक्षमीकरणासाठी नारी शक्ती वंदन विधेयक आणणार असल्याची घोषणा केली.

नवी दिल्ली : गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर संसद भवन अखेर संसद संकुलातील नवीन संसद भवनात स्थलांतरित झाले आहे. या नवीन संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयकाची घोषणा केली असून, तर याआधीच केंद्रीय मंत्रिमंळाच्या बैठकीमध्ये या विधेयकाला मंजुरी मिळाली असल्याचीही माहिती त्यांनी तेव्हा आता महिला आरक्षणाचा मार्ग घटना दुरुस्तीनंतर मोकळा होणार आहे.(Announcement of Womens Reservation Bill by Prime Minister The way will be cleared after constitutional amendment)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सरकार महिला सक्षमीकरणासाठी नारी शक्ती वंदन विधेयक आणणार असल्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदी यांनी यासाठी विरोधी पक्षांकडून सहकार्याची अपेक्षा केली असून, आजचा 19 सप्टेंबरचा हा दिवस इतिहासात अजरामर असेल असेही ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, असे टप्पे प्रत्येक देशाच्या विकासाच्या प्रवासात येतात, जेव्हा ते अभिमानाने सांगतात की आज आपण सर्वांनी एक नवा इतिहास रचला आहे. नवीन सभागृहाच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या भाषणात मी आत्मविश्वासाने आणि अभिमानाने सांगत आहे की, आजचा क्षण आणि आजचा दिवस म्हणजे गणरायांचे आशीर्वाद प्राप्त करून इतिहासात आपले नाव नोंदवण्याची वेळ आहे. हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे असेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : जुन्या संसदेला मिळाली आज नवी ओळख; पंतप्रधानांनी केली ‘ही’ घोषणा वाचा-

महिला आरक्षण विधेयकाचा सांगितला इतिहास

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, महिला आरक्षणाबाबत अनेक वर्षांपासून अनेक चर्चा होत आहेत. याबाबत अनेक वादविवाद झाले. महिला आरक्षणाबाबत संसदेत यापूर्वीही काही प्रयत्न झाले आहेत. यासंबंधीचे विधेयक 1996 मध्ये पहिल्यांदा मांडण्यात आले होते. अटल बिहारी यांच्या कार्यकाळात महिला आरक्षण विधेयक अनेकवेळा मांडण्यात आले, परंतु ते मंजूर करण्यासाठी आवश्यक ती माहिती गोळा करू शकले नाहीत आणि त्यामुळेच ते स्वप्न अपूर्ण राहिले असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Taiwan Earthquake: तैवानमध्ये शक्तिशाली भूकंप ; तीव्रता 6.3

कदाचित या पवित्र कामासाठी माझी निवड

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, अटल बिहारी यांच्या कार्यकाळात अपूर्ण राहलेल्या स्वप्नाबाबत बोलताना ते म्हणाले की, कदाचित देवाने माझी निवड महिलांना हक्क मिळवून देणे, त्यांना अधिकार देणे यासारख्या पवित्र कार्यासाठी केली असेल. आमच्या सरकारने या दिशेने पाऊल टाकले आहे. कालच महिला आरक्षण विधेयकाला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे. त्यामुळेच 19 सप्टेंबर ही तारीख इतिहासात अजरामर झाली आहे. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया झपाट्याने प्रगती करत आहेत आणि नेतृत्व करत आहेत, त्यामुळे आपल्या माता-भगिनींनी, आपल्या स्त्रीशक्तीचा धोरणनिर्मितीत सहभाग असणे अत्यंत गरजेचे आहे. जास्तीत जास्त योगदान द्या. फक्त योगदानच नाही तर महत्त्वाची भूमिका बजावा असेही ते यावेळी म्हणाले.

नारी शक्ती वंदन कायद्याद्वारे लोकशाही बळकट होईल

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा संकल्प पुढे नेत आमचे सरकार एक मोठी घटनादुरुस्ती विधेयक सादर करत आहोत. लोकसभा आणि विधानसभेत महिलांचा सहभाग वाढवणे हा त्याचा उद्देश आहे. या नारी शक्ती वंदन कायद्याद्वारे आपली लोकशाही अधिक बळकट होईल. तर नारी शक्ती वंदन कायद्याच्या माध्यमातून मी सर्व माता, भगिनी आणि मुलींना आश्वासन देतो की आम्ही या विधेयकाची अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध असणार आहोत असेही यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.

- Advertisment -